जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ ३१ वर्षांचा झाला आहे. यावेळी त्याचे वडील जॅकी श्रॉफ यांनी एका मुलाखतीत बर्‍याच गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, ‘मी टायगरच्या नावाचे एक रोप लावेल, माझ्या मुलाने वाढदिवसासाठी काही योजना आखली असावी. मी या दिवशी शूटिंगमध्ये व्यस्त आहे, म्हणून संध्याकाळी आपण नक्कीच काहीतरी योजना आखू, कदाचित एकत्र जेवन करू. ‘

जॅकी पुढे म्हणाला, ‘टायगरला काम करत राहणे आनंद देते. सध्याच्या काळात ज्या गोष्टी करणे त्याला योग्य वाटेल अशा गोष्टींवर तो केंद्रित आहे किंवा तो त्याबरोबर खुश असतो . मुलांना टायगर खूप आवडती हे पाहून मला आनंद होतो. मला इंडस्ट्रीत किंग अंकल आणि भिडू अशी नावे मिळाली पण आता लोक जेव्हा मला टायगरचा डॅडी म्हणतात तेव्हा अभिमान वाटतो. पूर्वी लोक माझ्या कामाचे कौतुक करायचे, आता ते माझ्या मुलाचे कौतुक करतात, हि माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे.’

जॅकी श्रॉफ

टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ आहे. जॅकी श्रॉफचा मुलगा जन्माला आला तेव्हा सुभाष घई त्यांच्या घरी पोहोचले. टायगरला पाहून सुभाषने १०१ रुपये हातात ठेवले आणि म्हणाले, “हि ऍडव्हान्स रक्कम आहे आणि मी तुला अभिनेता म्हणून लॉन्च करीन.” पण जेव्हा टायगर मोठा झाला आणि त्याने अभिनेता होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा प्रत्येकाला वाटलं की सुभाष टायगर समवेत त्याच्या ‘हिरो’ या सुपरहिट चित्रपटाचा रीमेक बनवेल, पण असं काही घडलं नाही आणि टायगरला साजिद नाडियाडवाला यांनी ‘हीरोपंती’ चित्रपटाद्वारे लाँच केले.

 

टायगरने आमिर खानला प्रशिक्षण दिले हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ‘धूम -३’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान टायगरने आमिरला आपले शरीर तयार करण्यास मदत केली होती. बॉलीवूड कुटुंबातील असूनही, टायगरला लहानपणापासूनच खेळ आणि नृत्य करण्याची आवड आहे. तथापि, त्याने अभिनेता होण्याचा विचार केला नव्हता. त्याला खेळ किंवा नृत्य क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती, परंतु नशीबात काहीतरी वेगळंच लिहले होते. आज टायगर बॉलीवूड मधील एक तरुण यशस्वी अभिनेता म्हणून समोर आला आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here