क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

या भारतीय क्रिकेटपटूकडे आहेत स्वतःचे प्रायवेट जेट, किंमत जाणून फिरतील डोळे..!


क्रिकेटच्या खेळात अनेकदा असे दिसून येते की खेळाडूंसोबत पैशांची कमतरता नसते. क्रिकेटशी संबंधित खेळाडूंकडे अनेक महागडी महागडी वाहने आणि मोठी घरेही आहेत. अनेक खेळाडू केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर जाहिरातींद्वारेही भरपूर पैसे कमवतात.

भारतीय क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत मंडळ मानले जाते आणि याच कारणामुळे भारतीय खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भरपूर पैसे दिले जातात. खूप कमी लोकांना माहिती असेल पण भारताच्या अनेक खेळाडूंकडे स्वतःची खासगी जेट्स आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे प्रायवेट जेट विमान आहेत..

जेट

विराट कोहली: भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीकडे स्वतःचे खासगी जेट आहे. काही काळापूर्वी जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा केला होता तेव्हा जेटसोबत विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. अपेक्षेप्रमाणे या जेटची किंमत सुमारे 125 कोटी रुपये आहे. हे जोडपे सेसना 680 सायटेशन सॉवरिन जेटमध्ये प्रवास करताना दिसले होते.

Advertisement -

महेंद्रसिंग धोनी: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची गणना जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. रिपोर्ट्सनुसार धोनीकडे स्वतःचे एक खासगी जेट आहे ज्याची किंमत सुमारे 260 कोटी रुपये आहे. धोनीचा त्याच्या जेटसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जेट

सचिन तेंडुलकर: भारतीय संघाचा महान क्रिकेटपटू आणि क्रिकेट विश्वाचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरची अनेकदा सर्वत्र चर्चा होते. या अनुभवी खेळाडूकडे खासगी जेट देखील आहे ज्याची किंमत सुमारे 260 कोटी रुपये आहे.

तेंडुलकर खासगी जेटचा मालक असल्याची चर्चा वर्ष 2016 मध्ये समोर आली होती. वरुण धवनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करताना ही माहिती दिली ज्यात तो सचिनसोबत प्रवास करताना दिसला होता.


हेही वाचा:

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

आरसीबी (RCB) कोरोना वॉरियर्सला सलाम करते: कोहलीची टीम आयपीएल सामन्यात लालऐवजी पीपीई किटसह निळी जर्सी परिधान करेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here