आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा

===

राजमा-चावल, छोले भटूरे किंवा बटर चिकन-नान, या खाद्यपदार्थांचे नावे जरी ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते. आपले भारतीय क्रिकेटपटूदेखील खाण्याचे फार शौकीन आहेत. परंतु तंदुरुस्ती व खेळात सक्रिय राहण्यासाठी त्यांना त्यांच्यापासून दूर रहावे लागते. परंतु, जेव्हा जेव्हा त्यांना हे खाद्यपदार्थं खाण्याची इच्छा होते तेव्हा ते खाण्यास मागेपुढे पाहत नाही. तर आपण आज धोनी-कोहलीपासून ते सचिन-सेहवागपर्यंत, काय कायदा खायला आवडते त्यावर एक नजर टाकूया.

एमएस धोनी: वयाच्या 39 व्या वर्षीही महेंद्रसिंग धोनीच्या फिटनेसला तोड नाही. तासाभराच्या व्यायामाबरोबरच तो जेवणावरही बरेच नियंत्रित करतो. तथापि, चीट डे ला  त्याला बटर चिकन-नान, कबाब आणि चिकन टिक्का, पिझ्झा खायला आवडते.

पदार्थ

विराट कोहली: भारतीय क्रिकेट संघातला सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून विराट कोहलीकडे पाहिले जाते. विराट कोहली त्याच्या डायट प्लॅनवर जास्त भर देतो. त्याला  ‘सुशी’ हा खाद्यपदार्थ खूप आवडतो. यासह त्याला दिल्लीमध्ये प्रसिध्द असलेले छोले भटुरे खूप आवडतात. तो आपल्या सुरूवातीच्या क्रिकेटच्या कारकीर्दीत छोले भटुरे खूपच खायचा. त्यानंतर त्याने फिटनेससाठी हे खाणे सोडून दिले. आता तो केवळ बॉइल आणि ग्रिल्ड फूड खात असतो.

Advertisement -

युवराज:  युवराज सिंगला कॉन्टिनेंटल जेवण खूपच आवडीने खातो. मात्र त्याला चायनीज बिलकुलही आवडत नाहीत. इंडियन जेवणाबद्दल विचार केला तर त्याला कढी भात आणि मटार पनीर खूपच आवडते.

रोहित शर्मा: भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आपल्या फिटनेस बाबतीत खूपच सजग आहे. तो दिवसाला 24-24 अंडी खातो. तो आलू पराठा खाण्याचे शौकीन आहे. मात्र फिटनेससाठी तो आलू पराठा खाणे बंद केले आहे.

शिखर धवन: टीम इंडियाच्या गब्बरला कढई चिकन फारच आवडते. याशिवाय त्याला नॉर्थ इंडियन मधील खास डिश बटर चिकन मसाला आणि हैदराबादी चिकन आवडीने खातो.

सचिन तेंदुलकर: सचिन तेंडुलकर हा देखील खाण्याचा खूप मोठा शौकिन आहे. त्याला किमा पराठे, प्रॉन्स मसाला, लस्सी, सुशी आणि साशिमी यासारखे खाद्य पदार्थ आवडतात. यासह त्याला मुंबईचा प्रसिद्ध वडापाव देखील प्रचंड आवडतो. अनेकदा वडापाव खातानाचे आपले फोटो त्याने शेअर केले आहे.

 पदार्थ

वीरेंद्र सेहवाग: वीरेंद्र सेहवाग फुडी आहे. त्याला बिर्याणी प्रचंड आवडते. एका मुलाखतीत त्याने सांगितला होते की  2011 चा विश्वचषक जिंकल्यानंतर तो त्याच्या मित्रांसोबत पोट भरून बिर्याणी खाल्ली होती.

रविचंद्रन अश्विन: टीम इंडियाचा कॅरम बॉल स्पेशालिस्ट रविचंद्रन अश्विन हा मात्र शुद्ध शाकाहारी आहे. त्याला त्याच्या आईच्या हातची बनवलेली पनीर शिमला मिर्चीची डिश अावडते.

रभजन सिंग: हरभजन सिंगला पंजाबी खाद्यपदार्थ खूप आवडतात. आलू पराठे यासह दहा पुदिन्याची चटणी तो आवडीने खातो.

गौतम गंभीर: माजी खेळाडू आणि बीजेपीचे खासदार गौतम गंभीर यांना राजमा चावल आवडते.

सौरव गांगुली :बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना बंगाली खाद्यपदार्थ आवडतात. ज्यामध्ये रॉयल बिर्याणी, आलू पोश्तो आणि चिंगरी माछेस, मलाई करी हे खाद्यपदार्थ खायला आवडतात

राहुल द्रविड़: मिस्टर डिपेंडेबल राहुल द्रविड याला घरी बनवलेले साधे पदार्थ खायला आवडतात. तो कधीकधी बटर क्रॅब जरूर खातो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here