जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

वार्मअप सामन्याचे गुण पकडले तरीही टीम इंडिया क़्वालीफाय होत नाही…!


2021 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाला विजयाचा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता, परंतु एकापेक्षा जास्त दिग्गजांनी भरलेला हा संघ पहिले दोन सामने गमावल्यानंतर चॅम्पियन बनण्याच्या शर्यतीतून बाहेर पडलेला दिसत आहे. पाकिस्तानकडून सामना हरल्यानंतर टीम इंडियाला न्यूझीलंडकडूनही 8 विकेटने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाच्या या पराभवामुळे आता उपांत्य फेरी गाठणे अशक्य आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने 20 षटकांत केवळ 110 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात न्यूझीलंडने हे लक्ष्य केवळ 14.3 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण केले. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली खूपच निराश दिसत होता. विराट कोहली म्हणाला की, त्याचे खेळाडू बॅट आणि बॉल दोन्हीने धैर्य दाखवू शकले नाहीत.

टीम इंडिया

सलग दुसऱ्या पराभवानंतर कोहली म्हणाला, ‘हे खूप विचित्र आहे. मला वाटत नाही की आम्ही आमच्या खेळात बॅट किंवा बॉलने धैर्य दाखवू शकलो आहोत. आम्ही खूप धावा केल्या नाहीत पण ते वाचवण्याची हिंमतही दाखवली नाही.तुम्हाला सांगतो की न्यूझीलंडविरुद्ध भारताचे टॉप 4 फलंदाज अतिशय खराब शॉट्स खेळून बाद झाले.

Advertisement -

इशान किशनला केवळ 4 धावा करता आल्या. रोहित शर्मा 14, केएल राहुल 18 आणि रोहित शर्मा केवळ 9 धावा करू शकले. फलंदाजांच्या फ्लॉपनंतर गोलंदाजांना काही करता आले नाही आणि त्याचा परिणाम टीम इंडियाच्या पराभवात झाला.

टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मिडीयावर प्रेक्षकांचा प्रचंड राग पहायला मिळाला.

काहींनी तर चक्क भारतीय खेळाडू आयपीएल खेळण्यापुरते मर्यादित असावेत असचं म्हटलंय. त्यांतर काही मिम्स जोरात व्हायरल होत आहेत..

 

 


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here