आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आपणास पावसाळ्यात होणाऱ्या फंगल इन्फेक्शन पासून स्वतःचा बचाव कसा करायचा त्याबद्दल माहिती सांगणार आहोत.

आपल्या माहितीप्रमाणे उन्हाळा ऋतू मध्ये जास्तीत जास्त लोकांना घामोळ्या चा त्रास होत होता. त्याचबरोबर आपल्या शरीराला पावसाळा ऋतू मध्ये फंगल इन्फेक्शन होण्याचा फार मोठा धोका असतो कारण पावसाळ्यात वातावरण दमट आणि कोंदट स्वरूपाचे असते त्याचबरोबर ऊन सुद्धा जास्त नसते त्यामुळे आपले शरीर आणि कपडे ओले राहिल्यामुळे आपल्या ला पावसाळ्यात फंगल इन्फेकॅशन चा त्रास हा जास्त होतो.

फंगल इन्फेक्शन
फंगल इन्फेक्शन

त्यासाठी लोक थंड पाण्याने अंघोळ करत होते तसेच कडुलिंबाचा पाला वापरून म्हणजेच सकाळी गरम पाण्यात कडूलिंबचा पाला टाकून आपण अंघोळ सुद्धा करत होता आणि ते केल्याने आपल्या घामोळ्या नष्ट होत असत.

तर काही लोक मेडिकल मधून वेगवगेळ्या पावडर तसेच गोळ्या आणून जिथे घमोळ्या असतात तिथे लावून त्यापासून दूर राहत असत.

तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे की कडूलिंबाचा पाला आपल्या शरीरासाठी किती फायदेमंद आहे, त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही तसेच आपले आरोग्य सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे राहते.

आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत जे की पावसाळा चालू झाला की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होते मग आपण डॉक्टर कडे जाऊन वेगवेगळे मेडिसिन आणतो आणि त्यापासून सुटका करतो पण त्यासाठी भरपूर कालावधी लागतो.

पावसाळा चालू झाला की वातावरण पण थंड असते आणि जास्तीत जास्त ओलावा साचलेला असतो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे फंगल इन्फेक्शन आपल्याला होत असे जसे की कुठे नायटा उठलेला असतो तर कुठे वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे उठलेले असतात, फंगल इन्फेक्शन म्हणजे आपल्या शरीरावर पाण्याचा ओलावा साचतो आणि त्यामुळे होणारे इन्फेक्शन.

आपल्या जवळच्या आसपास लोकांमध्ये आपण बऱ्याचवेळा पाहतो की काहींच्या शरीरावर खरूज उठलेला असती आणि त्याची भरपूर प्रमाणात खाज झालेली असते त्यामुळे आपल्याला बराच त्रास होतो. आज आम्ही तुम्हाला या फंगल इन्फेक्शन पासून कसे दूर राहायचे हे सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला एका रात्रीत फरक पडेल. चला तर पाहूया मग हा कोणता आयुर्वेदिक उपाय आहे.

आयुर्वेदिक उपाय –

आपल्या घरात लिंबू असते त्या लिंबाचा एक चमचा रस घेणे, त्यानंतर कडुलिंबाच तेल एक चमचा तेल घेणे जर तुमच्याकडे कडूलिंबचा तेल नसेल तर नारीयल तेल घ्या आणि त्यामध्ये आपण रोजच्या प्रमाणे देवाची पूजा करताना कापुर जाळतो त्या कापराच्या दोन वड्या घ्या म्हणणे दोन कपूर घ्या आणि त्याची बारीक पावडर करा.

हे झाल्यानंतर ते सर्व मिश्रण एकत्र करा आणि जिथे तुम्हाला फंगल इन्फेक्शन झाले आहे तिथे लावा, रात्री लावून झोपल्याने सकाळी तुम्ही जेव्हा उठाल त्यावेळी तुम्हाला फरक पडलेला दिसेल. तुम्हाला फंगल इन्फेक्शन पासून नक्की आराम भेटेल.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here