आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

शेतकरी शेतीबरोबरच पशुपालन हा जोडव्यवसाय करत असतो. पशुपालन मधून तो खरेदी विक्री आणि दुघव्यवसाय करत असतो. आणि त्यातून दुहेरी उत्पन्न मिळवत असतो.

 

मुरघास
मुरघास

उन्हाळ्यात गुरांना चाऱ्याच्या अनेक समस्या येत असतात. चाऱ्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे जनावरे दूध सुद्धा कमी देतात. या सर्वावरील तगडा उपाय म्हणजे चाऱ्याचे सिलेज बनवून ठेवणे. सिलेज म्हणजेच मुरघास.

Advertisement -

मुरघास का बनवावा:- उन्हाळ्यात जनावरांना ओला चारा मिळत नाही त्यामुळं दूध उत्पादनात घट होत असते. जर का तुम्ही मुरघास बनवला आणि पॅकबंद ठेवून त्याचा उपयोग उन्हाळ्यात केला तर ओल्या चाऱ्याचा प्रश्न मिटतो आणि दूध उत्पादनात सुद्धा मुरघासमुळे वाढ होते.

मुरघास बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- ओली वैरण उदारणार्थ: मका, ज्वारी, बाजरी,गवत, किंवा ऊस.
ओली वैरण बारीक करून झाल्यावर 1000 ते 5000 किलो क्षमतेच्या बॅग बाजारात मिळतात त्यात ओला चारा साठवणे ,सोबत मीठ,गूळ आणि बुरशीनाशकांची पावडर आवश्यक असते.

बनवण्याची प्रक्रिया:- सुरवातीला ओला चारा म्हणजेच मका ज्वारी बाजरी किंवा ऊस हा कडबाकुटी वर बारीक करून घ्यावा. बारीक करून झाल्यावर तो चारा त्या सिलेज बॅग मध्ये भरावा. भरतेवेळी तो चारा तुडवून भरावा. तसेच काही वेळेनंतर त्यामध्ये मीठ किंवा बुरशीनाशकांची पावडर घालावी.

आणि थोडासा खिसून गूळ घालावा. संपूर्ण बॅग भरून झाल्यावर ती घट्ट बंद करून घ्यावी त्यामध्ये हवा किंवा पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. अश्या प्रकारे 1.5 महिने ते 2 महिने या काळात मुरघास बनून तयार होतो.

कोणती काळजी घ्यावी:-
1) बॅग बंद केल्यावर हवा आणि पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.
2) बॅग ला कोठेही छिद्र नसावे.
3) जर का त्यात पाणी गेले तर मुरघास खराब होतो.

मुरघास जनावरांसाठी फायदेशीर:-
1) जनावरांना उपयुक्त असणारे पोषक घटक ही मुरघासातून मिळतात.
2)दूध उत्पादन वाढते.
3) जनावरे सुधारतात म्हणजेच सुदृढ आणि निरोगी बनतात.
4) कमीत कमी एका जनावराला प्रति दिन 10 ते 12 किलो मुरघास द्यावा.
5)ऐन उन्हाळ्यात सुद्धा जनावरांना ओला चारा मिळतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here