आजकाल प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता तरी हा आजार असतोच. त्याचबरोबर बदलत्या काळाबरोबर लोकांच्या सवयी सुद्धा खूप च बदलल्या आहेत. या मध्ये सर्वात हानिकारक बाब म्हणजे आळशीपणा, व्यायाम न करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तम आहार न घेणे.

या सर्व वाईट सवयीचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. यामुळे अनेक नवीन नवीन आजार माणसाला होत असतात यातून जर वाचायचे असेल तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूपच महत्वाचे आणि गरजेचे आहे.

मांसाहार केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते परंतु आज आपण शाकाहारी लोकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी या बद्दल माहिती देणार आहोत.

रोगप्रतिकारक शक्ती

1)शुद्ध खोबरेल तेल:-
शुद्ध खोबरेल तेल हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. खोबरेल तेलात मोनोलोरीन नावाचा घटक असतो. जे शरीरातील अपायकारक आणि दूषित जीवाणू चा नायनाट करण्यास मदत करते. यासह जलद गतीने आपले वजन कमी करण्यासाठी सुद्धा नारळाच्या खोबरेल तेलाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो.

2)आले:-
आले हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. त्याचबरोबर आले हे विविध रोगांवर गुणकारी आहे. आल्याचे खूप महत्वाचे फायदे आहेत. आल्यामध्ये  अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट  हे गुणधर्म असतात त्यामुळे माणसाच्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती जलद वाढण्यास मदत होते.

3)हळद:- सर्वात उपयुक्त आणि आयुर्वेदिक अशी हळद. हळदी मध्ये अँटी-ऑक्सिडंट घटक असतात. त्यामुळे जर का आपणास खोकला आला तर गरम दुधात हळद टाकून पिणे खूपच फायदेशीर असते.

4) काळी मिरी:- हा सुद्धा एक मसाल्याच्या पदार्थ आहे तसेच हळद आणि काळी मिरी यांचे गुणधर्म हा सारखेच आहेत त्यामुळे काळी मिरी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

5)कलौंजी:-   हा सुद्धा एक मसाल्याचा प्रकार आहे या मध्ये प्रामुख्याने अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात त्यामुळे हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

अश्या प्रकारे आपण मांसाहार न करता सुद्धा आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता. आणि आरोगी राहू शकता.
आम्हास आशा आहे की हा लेख आपल्याला आवडल्यास लाइक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेयर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here