आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

शरीरात रक्ताचे प्रमाण योग्य असणे खूप गरजेचे आहे. कारण जर का शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यावर अशक्तपणा येतो तसेच चालताना दम लागणे इत्यादी प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळं शरीरात रक्ताचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे.

रक्ताचे प्रमाण
रक्ताचे प्रमाण

शरीरातली रक्ताचे प्रमाण वाढवण्याच्या उपाययोजना:-
1) शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी दररोज आहारात गूळ आणि शेंगदाण्याचे सेवन करावे.

2)तसेच आहारात फळांचा रस तसेच सफरचंदाचा रस पिल्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते तसेच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते.

3)तसेच आहारात जेवणाबरोबर बिट चे सेवन करावे. बिट चे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्त पातळी मोठया प्रमाणात वाढते.

Advertisement -

4)दररोज चहा आणि कॉफी पिणे टाळावे. चहा आणि कॉफी मध्ये कॅफेन असल्याने शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होत असते.

5)दररोज संध्याकाळी दोन ते तीन चमचे तीळ भिजवावे. नंतर त्या तिळाची पेस्ट करावी आणि त्यामध्ये मध मिसळून त्या पेस्ट चे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.

6) दिवसातून दोन वेळा गार पाण्याने अंघोळ करून सूर्य सूर्यप्रकाशात बसावे.

7)आहारात मिठाचे  आणि लसणाचे सेवन केल्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

8)टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच आहारात टोमॅटो चे सेवन करणे फायदेशीर ठरत आहे.

9)डाळिंबाचे सेवन केल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण भरपूर वाढते. डाळिंबामध्ये लोह आणि कॅल्शियमसोबत प्रथिनं, कर्बोदकं आणि फायबर याचे प्रमाण मोठया प्रमाणात असते तसेच डाळिंबाचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढत असते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here