आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कोरोनाच्या काळात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. कोरोना पासून वाचायचे असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही वाढविण्यासाठी भर दिला पाहिजे. हेच खूप आवश्यक आहे.

कोरोना म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतोच. कोरोना झाल्यावर सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात अशक्तपणा येतो शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते इत्यादी गोष्टी समोर येतात.

तर चला मित्रानो आज आम्ही तुम्हाला रक्तातील प्लेटलेट्स बद्दल माहिती सांगणार आहोत. प्लेटलेट्स हा शब्द आपण ठराविक वेळाच ऐकलं आहे. कारण या शब्दाचा वापर जास्त करून होत नाही.

जर एकाद्या वेळेस डॉक्टर बोलतात की तुमच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत तर लगेच आपण चिंतेत पडतो कारण हा शब्द आपल्यासाठी ऐकायला नवीन असतो त्यामुळं आपण घाबरून जातो.

आपल्या शरीरात 3 प्रकारच्या पेशी असतात. त्यामध्ये लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि शेवटी असतात त्या प्लेटलेट्स. या 3 प्रकारच्या पेशी आपल्या रक्तात उपलब्ध असतात.

साधारणता माणसाच्या शरीरात जास्तीत जास्त दीड लाख ते साडे चार लाख एवढ्या प्लेटलेट्स आढळतात.
जर का आपल्याला डेंगू मलेरिया आनुवंशिक आजार चिकणगुणिया या सारख्या आजरामुळे आपल्या शरीरातील रक्तातील प्लेटलेट्स चे प्रमाण कमी होते.

जर का तुम्हाला रक्तातील प्लेटलेट्स वाढवायची असल्यास हे घरगुती उपाय तुम्ही करूनच बघा.

1)गुळवेल:- रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी खूपच गुणकारी असा गुळवेल आहे. संध्याकाळी झोपताना गुळवेल पाण्यात भिजत घालून सकाळी उठल्यावर ते पाणी पियावे त्यामुळं आपल्या रक्तातील प्लेटलेट्स चे प्रमाण वाढण्यास मदत होते.

2) भोपळा:-रोज जेवणात भोपाळ खावा, कारण भोपल्यामध्ये अ हे जीवनसत्व आढळते आणि त्यामुळे रक्तातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.

3)नारळ पाणी- नारळ पाण्यात क्षार चे प्रमाण असते त्यामुळं त्याचा फायदा सुद्धा रक्तातील प्लेट्स वाढवण्यासाठी होतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here