आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला प्रतापगड किल्ल्याचा इतिहास आणि वारसा या विषयी माहिती बघणार आहोत.

प्रतापगडाचा इतिहास
प्रतापगडाचा इतिहास

वयाच्या 16 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मूठभर मावळ्यांना घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापन केले.

आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तोंडून जय येतंच. असा आपल्या देशाचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यामुळे आपल्या देशाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

संपूर्ण आयुष्यात शिवाजी महाराजांनी 350 किल्यांपेक्षा जास्त किल्ले जिंकले आहेत. त्यामधला एक म्हणजे प्रतापगड.

प्रतापगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात आहे. या किल्ल्याची उंची 3556 फूट आहे. हा एक गिरीदुर्ग प्रकारचा किल्ला आहे.

प्रतापगड हा किल्ला सातारा येथे आहे, सभोवताली हिरवी गार झाडी, डोंगररांगा, यांनी वेढलेला आहे. शिवाजी महाराजांचा सर्वात महत्वाचा किल्ला आहे. त्याच शेजारी कास चे सुंदर पठार आणि थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर शेजारी असल्यामुळे हेच पर्यटन स्थळ बनलेले आहे.

प्रतापगड येथे अबजल खान आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीमुळे प्रतापगडाला ऐतिहासिक रूप प्राप्त झाले आहे. याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला जीव मारून प्रतापगडाच्या पायथ्याला समाधी बांधली आहे. मराठा साम्राज्याचा हा एक महत्वाचा किल्ला आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here