जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ही आहे जगातील सर्वात महागाडी जेल,कैद्यांवर केले जातात करोडो रुपये खर्च…


जेल च नाव ऐकलं की आपल्या मनात कितीतरी वेगळे विचार येतात जसे की तेथील सुरक्षा कशी असेल, जे कैदी आहेत त्यांचे खाणे पिणे कसे असेल. पण क्युबा मध्ये अशी एक जेल आहे जिथे हे विचार करणे म्हणजे अगदी वेडेपणाचे काम, कारण तिथे एका कैदयावर वर्षाला करोडो रुपये खर्च केले जातात त्यामुळे क्युबा मधील जेल ला सर्वात महागडी जेल असे म्हणले जाते.

ग्वांतानमो बे जेल असे या जेल च नाव आहे, बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला की हे कसले नाव पण हे जेल एका खाडीच्या तटावर आहे ज्या खाडीचे नाव ग्वांतानमो खाडी असे आहे. या जेल मध्ये सध्या ४० कैदी आहेत आणि इथे प्रत्येक एका कैद्यावर वर्षाला ९३ करोड रुपये खर्च केले जातात.जेल

या जेल मध्ये कमीत कमी १८०० पोलीस आहेत, इथे एका कैदयावर नजर ठेवायला ४५ पोलीस ठेवले आहेत. या जेलसाठी ज्या पोलिसांना तैनात केले आहे त्या पोलिसांवर वर्षाला ३९०० करोड रुपये खर्च केले जातात.

 

Advertisement -

तुम्ही विचारात पडला असाल की नक्की काय आहे जेल मध्ये आणि कैदी लोकांना एवढी का सुरक्षा दिली जाते. आम्ही आपणाला सांगू इच्छितो की इथे प्रत्येक गुन्हेगाराला ठेवले जाते जो खूप खतरनाक गुन्हेगार असतो. मीडिया च्या माहितीनुसार ९/११ च्या हमल्यातील मास्टरमाइंड खालिद शेख मोहमद सुद्धा या जेल मध्ये बंद आहे.

जेल

या जेल मध्ये ३ इमारती आहेत, दोन गुप्त मुख्यालय आणि तीन हॉस्पिटल आहेत. या व्यतिरिक्त तिथे वकिलांसाठी वेगळे वेगळे कंपाउंड बनवले आहेत त्यामुळे वकील कैदयासोबत बातचीत करेल. जेल मध्ये तेथील स्टाफ आणि कैदयासाठी चर्च आणि सिनेमा गृह ची व्यवस्था सुद्धा केली आहे, तसेच तेथील कैदयाना जेवणासाठी पण चांगले पदार्थ दिले जातात आणि तिथे त्यांना जिम सुद्धा आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here