आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

बॉलिवूड मध्ये अनेक नवनवीन सुपरस्टार आपले चित्रपट करण्यासाठी येत असतात, जसे की त्यांची काही वेळ कारकीर्द राहते पण हळू हळू त्यांना काम भेटत नाही मग खुप मोठा ब्रेक घेऊन नंतर ते आपल्या भेटीला येतात व असे काही हिरो आहेत जे सुरुवातीला अगदी धमाकेदार एन्ट्री ने बॉलिवूड मध्ये पदार्पण करतात आणि त्याच जोमाने ते कायम या इंडस्ट्री मध्ये टिकतात ज्यामध्ये कार्तिक आर्यन असो किंवा टायगर श्रॉफ असो.

सध्या टायगर श्रॉफ चे  चाहते अनेक वेळ वाट पाहत आहेत की त्याचा एखादा चित्रपट कधी येतोय ज्यामद्धे नेहमी टायगर ची एन्ट्री अगदी कडक आणि धमाकेदार पद्धतीने होत असते. आज आपण टायगर श्रॉफ चा आगामी चित्रपट जे की अजून त्याची शूटिंग चालू आहे त्या बद्धल बोलणार आहोत.

टायगर ने बॉलीवूड मध्ये त्याच्या हिरोपंती या पहिल्या चित्रपटातून एन्ट्री मारली, जी एन्ट्री अजूनही बॉलिवूड मध्ये टिकून आहे.

टायगर श्रॉफ
टायगर श्रॉफ

त्याच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर त्याचे एवढे चाहते झाले की आज इन्स्टाग्रामवर पाहिले तर त्याचे मिलीयन मध्ये फॅन्स फॉलोअर्स आहेत. त्याच्या पहिल्या चित्रपटात त्याची बॉडी त्याची ऍक्शन धमाकेदार असल्याने त्याचा अजूनही कोणता चित्रपट आला की तो सुपरहिट चालतो.

सध्या हिरोपंती २ ची चर्चा चालू आहे तर त्याची शूटिंग सध्या चालू आहे, साजिद नाडीयाडवाला याचा चित्रपट अहमद खानद्वारे डायरेक्ट होत असून त्याची छोटी शूटिंग मुंबई मध्ये ७ मार्च रोजी करण्यात आली होती. सध्या पुढच्या शूटिंग ला त्यांच्या टीम ची पावले रशिया कडे ओळत असल्याचे दिसून आले आहे.

हिरोपंती २ मध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेत टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आहेत. तर लवकरच टायगर श्रॉफ च्या चाहत्यांना गुड न्युज ऐकायला भेटणार आहे आणि हा चित्रपट लवकरच भेटीला येईल अशी आशा आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here