जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====


पाण्यात भिजलेल्या मनुका खाण्याचे आरोग्यदायी फायदे..


 

आजच्या गतिमान जीवनात आपण आपल्या आरोग्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सर्वसामान्य स्वयंपाक घरात उपलब्ध होणाऱ्या मनुका नियमित खाल्याने कोण कोणते आरोग्यदायी फायदे होतात याबद्दल. हे फायदे जाणून आपणही दररोज याचे सेवन कराल.

 

मनुकामध्ये विटामिन, मिनरल्स यांचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे मनुकांचे नियमित सेवन केल्याने तुमची पचनशक्ती वाढते आणि त्यासोबतच शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

मनुका

मनुका खाण्याचे फायदे.

  • रात्री झोपताना १५-२० मनुका पाण्यात भिजत ठेवाव्या आणि सकाळी त्यांचे सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
  • मनुकांमध्ये आयरन, विटामिन बी, यांची मात्र जास्त असते, भिजत ठेवलेल्या मनुका खाल्याने शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत राहतो. यामुळे तुम्हाला एनिमिया होण्याचा धोका कमी होतो आणि शरीरात रक्तवाढ होते.
  • पाण्यात भिजलेल्या मनुका खाल्याने शरीराला विटामिन बी सोबत भरपूर एंटीऑक्सीडेंट प्राप्त होतात ज्यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते.
  • पाण्यात भिजलेल्या मनुका खाल्याने रक्तदाबाचा धोका कमी होतो कारण मनुकांमध्ये सोडियम असते आणि सोडियमयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.
  • रात्रभर ज्या पाण्यात मनुका भिजत होत्या ते पाणी पिल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • भिजत ठेवलेल्या मनुका खाल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात, कारण मनुकांमध्ये कैल्शियम आढळून येतो.

ज्या प्रकारे आपण आपल्या दैनंदिन जीवनात इतर गोष्ठीना महत्व देती त्याचप्रमाणे आता आपणास आपल्या शरीराकडे आणि आरोग्याकडे लक्ष देणे अनिवार्य झाले आहे. यावर थोडाफार उपाय म्हणून जर आपण दररोज थोडासा व्यायाम आणि खानपानाची काळजी घेतली तर आपण निरोगी राहतील.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here