आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आपले शरीर जर तंदुरुस्त असेल तर आपल्याला अगदी प्रसन्न वाटते पण जर आपल्या शरीरातील ज्या वेळी एखादा अवयव दुखत असेल त्यावेळी आपल्याला खूप त्रास होतो अगदी आजारी पडल्यासारखं वाटत. पण चांगल्यापणी आपण आपल्या शरीरावर लक्ष न देता ज्यावेळी काही दुखायला लागेल त्यावेळी आपल्याला सर्व समजत.

 

डोकं दुखतंय
डोकं दुखतंय

जसे की आपल्याला डोकेदुखी चा त्रास किंवा कधी कधी दाड दुखायला चालू होते आणि याने आपली परिस्तिथी खूप व्याकुळ होते जसे की बाकीच काही असुद्या पण हे एक अस आहे की आपल्याला आराम केल्याशिवाय पर्याय नसतो. डोकेदुखी म्हणजे यासाठी बरीच कारणे जशी की अपुरी झोप, मानसीक ताणतणाव, एखाद्या गोष्टीची चिंता करणे. उन्हात खुप वेळ काम करणे, मोबाईल किंवा कॉम्प्युटर चा जास्त उपयोग केल्याने डोळे दुखणे नंतर पित्त होणे यामुळे आपल्याला खूप त्रास होईल लागतो.

आपण सर्वसामान्य मेडिकल मध्ये जाऊन औषधे आणतो त्यातही महिला खूप अग्रेसर असतात, डोकं दुखायला लागले की एखादी गोळी आणून खायची आणि कामाला सुरुवात करायची पण याचा परिणाम आपल्या शरीरावर खुप प्रमाणावर होतो. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत.

१. पाणी भरूपूर प्रमाणात पिणे –

आपल्या शरीरातील ज्यावेळी पाणी कमी होते त्यावेळी आपल्याला डोकेदुखीचा त्रास चालू होतो, आपण एखाद्या गोष्टीची चिंता किंवा मानसिक तणाव आला की आपल्या शरीरात पाण्याची पातळी कमी होते आणि डोकेदुखी चालू होते. त्यासाठी ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण असते जसे की कलिंगड, संत्री यासारख्या विविध फळांचे सेवन केले की तुम्ही यापासून सुटका करू शकता.

२. मद्यपान –

शक्यता मद्यपान करू नये पण जरी केले तर ते मर्यादित असावे, कारण मद्यपान केल्याने सुद्धा डोकेदुखी वाढते जसे की आपल्याला सारखे लघवी ला लागते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील पाणी कमी होते आणि आपल्याला त्रास होतो.

३. झोप –

दिवसभर काम करून रात्री जर नीट झोप घेतली नाही तर आपल्याला दिवसभर डोकेदुखी चा त्रास होतो त्यामुळे माणसाने कमीतकमी सहा ते सात तास शांतपणे झोप घेतली पाहिजे, आणि जे लोक जास्त झोप घेतात त्यांना सुद्धा त्रास होतो त्यामुळे तुम्ही झोपेची वेळ निश्चित केली पाहिजे.

४. अन्नपदार्थ –

तुम्ही आहारात सुद्धा कोणते पदार्थ घेता यावरून सुद्धा तुम्हाला डोकेदुखीचा त्रास उदभवू शकतो जसे की तुम्हाला चीज, आंबट फळे, दारू इ. पासून त्रास होत असेल तर त्यांना तुम्ही आहारातून काढून टाका. याला एलिमिनेशन असे म्हणतात आणि यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही.

५. थंड जेल –

जेव्हा डोके दुखायला सुरू होते त्यावेळी आपण थंड जेल ज्या ठिकाणी दुखत आहे त्या ठिकाणी लावले पाहिजे म्हणजे आपले डोके शांत येईल तसेच जर तुमच्याकडे हे उपलब्ध नसेल तर थंड पाण्यात टॉवेल भिजवून तो आपल्या डोक्याच्या भागावर ठेवावा यामुळे सुद्धा आपल्यावर फरक पडतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here