सुनील गावस्कर

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

सचिन-सेहवागलाही तोडता आला नाही सुनील गावस्कर यांचा ‘हा’ विक्रम!


भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर आज आपला 72 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. गावस्कर यांनी आपल्या 16 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत बरीच मोठी कामगिरी केली. गावस्कर कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिले फलंदाज होते. 1983 च्या विश्वचषकात प्रथमच भारताला चॅम्पियन बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 1970 -80 च्या दशकात वेस्ट इंडीजच्या धोकादायक वेगवान हल्ल्याचा सामना करण्यासाठी जगातील फलंदाजांपैकी गावस्कर एक. गावस्कर यांनी काही काळ भारतीय संघाचे नेतृत्वही केले.

सुनील गावस्कर

सुनील गावस्करने 1971 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.  त्याच्या पहिल्या कसोटी मालिकेत गावस्करने वेस्ट इंडिजसारख्या धोकादायक गोलंदाजीच्या समोर 774 धावा केल्या. गावस्करने आपल्या कारकीर्दीत एकूण 125 कसोटी सामने खेळले आणि या दरम्यान त्याने 51.12 च्या प्रभावी सरासरीने 10,122 धावा केल्या. गावस्करने कसोटी कारकीर्दीत 34 शतके आणि 45 अर्धशतके झळकावली. गावस्कर हे एकमेव खेळाडू आहेत जे भारताकडून सलग 100 हून अधिक कसोटी सामने खेळतो.  ‘लिटल मास्टर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावस्करने 47 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले, त्यापैकी 9 सामने जिंकले आणि 8 सामने गमावले, तर 30 कसोटी सामने अनिर्णित राखले.

कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून खेळत सर्वात वेगवान 5,000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम अजूनही सुनील गावस्करच्या नावे आहे. त्यांनी फक्त 95 डावांमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहलीसारखे फलंदाज त्याच्या विक्रमाजवळ आले, पण तो मोडण्यात अपयशी ठरले. गावस्कर यांनीही भारताकडून 108 एकदिवसीय सामने खेळले आणि 35.13 च्या सरासरीने 3092 धावा केल्या. त्यांनी वनडे कारकिर्दीत 1 शतक आणि 27 अर्धशतके झळकावली. टीम इंडियाच्या या महान फलंदाजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 25, हजार 834 धावा केल्या आणि 81 शतके ठोकली.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here