जगभरातील महत्वाच्या बातम्या आणि लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

मला संपवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते षडयंत्र रचत आहेत- गोपीनाथ पडळकर


आडपाडी येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप लगावण्यास सुरूवात केली आहे. महाविकास आघाडीकडून षडयंत्र रचून मला संपवण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे.

पडळकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, वारंवार आपण महाविकास आघाडीच्या विरोधात आवाज उठवत आहे. त्यामुळे मला संपवण्यासाठी षडयंत्र रचून हा हल्ला झाला. शिवाय एसटी आदोलंनाला पाठिंबा देण्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी मुंबईत मोठं आंदोलन आपण पुकारले आहे. त्याठिकाणी मला पोहचवून न देण्यासाठी महाविकास आघाडीने हे षंडयंत्र रचले, असा आरोप पडळकरांनी केला आहे.

गोपीनाथ पडळकरगोपीनाथ पडळकर

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे रविवारी गोपीचंद पडळकरांच्या आणि शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये 2 जण जखमी झाले तर काही वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या सर्व प्रकरणानंतर आटपाडी पोलिस स्टेशनमध्ये गोपीनाथ पडळकरांसह इतर 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Advertisement -

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतला होता. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे यासह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता. पडळकर सुरूवातीपासून एसटी कर्मचाऱ्यांना पाठींब्यात मैदानात उतरले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा त्यानी राज्य सरकारला दिला आहे.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here