आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

21 वे युग हे डिजिटल युग आहे. सर्वत्र म्हणजेच संपुर्ण जगभर इंटरनेट चे जाळे।मोठ्या प्रमाणात पसरले आहे. इंटरनेट चे अनेक फायदे आहेत तसेच त्याचे तोटे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.

आजकाल इंटरनेट चा उपयोग प्रत्येक ठिकाणी होतो. शाळा, कॉलेज, ऑनलाइन कामे, दवाखान्यात इंटरनेट चा वापर होतो. इंटरनेट च्या माध्यमातून माणसांची कामे अगदी सहज आणि कमी वेळात होत आहेत. कामाला ऑटोमॅटिक चे स्वरूप प्राप्त झाले आहेत. तसेच एका बटनावर कामे होतात.

गुगल
गुगल

आजकाल ची तरुण पिढी ही इंटरनेट च्या पूर्णपणे आहारी गेली आहे. याचा सर्वात मोठा तोटा हा तरुण पिढीला होत आहे. तरुण पिढी इंटरनेट मुळे दिवसेंदिवस आपला किमती वेळ मोबाईल वर घालवत आहेत तसेच याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर तसेच मानसिकतेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे.

तुम्ही तासंतास इंटरनेट वापरता परंतु तुम्हाला माहितेय का? जर का तुम्ही या गोष्टी इंटरनेट वर सर्च केल्या की तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो.

Advertisement -

भारत सरकार चाइल्ड पॉर्नबाबत खूपच कडक धोरणे आहेत. जर का तुम्ही  गुगलवर चाइल्ड पॉर्न सर्च केले तर तुम्हाला जेल मध्ये जावे लागू शकते, कारण इंटरनेट वर चाईल्ड पॉर्न बघणे आणि सर्च करणे बेकायदेशीर आहे त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच हे पॉर्न विडिओ शेयर करणे सुद्धा एक प्रकारचा गुन्हाच आहे. या मध्ये तुम्हाला कमीत कमी 5 ते 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

तसेच कोणत्याही महिलेची छेडछाड आणि अत्याचार झालेल्या महिलेचे नाव आणि फोटो देणे किंवा काढणे हा सुद्धा एक गुन्हा आहे. विनयभंग किंवा अत्याचार झालेल्या पीडितेचे नाव आणि फोटो उघड करणे सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर घोषित केले आहे. त्यामुळे तुम्ही असे केले तर तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here