जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

संजय लीला भन्साळी यांच्या पुढच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटात अजय देवगण महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. २७ फेब्रुवारीपासून तो मुंबईत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. हा चित्रपट अजयसाठी खास ठरणार आहे कारण तो २२ वर्षांनंतर पुन्हा भन्साळीसोबत काम करणार आहे. अजयने २२ वर्षांपूर्वी आलेल्या संजय लीला भन्साळीच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात काम केले होते.

गंगुबाई

या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. अलीकडेच संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता, त्यात आलियाच्या गंगूबाई काठियावाडीच्या अवताराचे कौतुक झाले. अजय देवगनही आलियाच्या विरुद्ध नाही, ते तीच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.

चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शूटिंगदरम्यान कलाकार आणि क्रू मेंबर्सचा जास्तीत जास्त वेळ वाचवण्यासाठी सेटवर खास पद्धती अवलंबल्या जात आहेत आणि रात्री जास्तीत जास्त सीन्स शूट केले जात आहेत.

gangubai kathiawadi

सूत्रांनी सांगितले, ‘कलाकार आणि क्रू सदस्य संध्याकाळी उशीरा सेटवर येतात. रात्रभर शूट करातात आणि सकाळी घरी परतात. दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी सेटवर परतात. अशा प्रकारे, प्रत्येकजण मुंबईच्या रहदारीत अडकण्यापासून वाचला आहे. तसेच सेटवर रात्रीच्या सावलीत आम्ही कामठीपुराचं जग कॅमेर्‍यावर टिपलं आहे.

शूटसाठी सेटच्या डिझाईनवर जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च झाले आहेत. या चित्रपटात गंगूबाईची कहाणी दाखविण्यात येणार आहे. गांगुबाई हे ६० च्या दशकात मुंबई माफियात मोठे नाव होते. तिला तिच्या पतीने अवघ्या पाचशे रुपयात विकल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून ती वेश्या व्यवसायात गुंतली होती. यावेळी त्यांनी या परिस्थितीतील मुलींसाठी बरीच कामेही केली.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here