क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

फोर्ब्जची २०२१ मधील जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या फुटबॉलपटूंची यादी जाहीर!


फोर्ब्जच्या यादीत आपले नाव येणे ही खूप भाग्याची गोष्ट समजली जाते. फोर्ब्जने बुधवारी आपली ‘२०२१ मधील जगातील सर्वाधिक कमाई करणारे फुटबॉलपटू’ यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डोने आश्चर्यकारकपणे लिओनेल मेस्सीची जागा घेतली आहे. २०२१-२२ च्या सिझन मध्ये सर्वाधिक कमाई करणारे हे आहेत टॉप-५ फुटबॉलपटू:

 

५. मोहम्मद सलाह
रॉबर्ट लेवनडॉस्की ला मागे टाकत मोहम्मद सलाह ने या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे. २९ वर्षीय या खेळाडूची एकूण कमाई ४१ मिलियन डॉलर्स असून त्यापैकी २५ मिलियन डॉलर्स हे त्याचे मानधन असून १६ मिलियन डॉलर्स ची कमाई त्याला जाहिरातींमधून होते.

 

Advertisement -

४. किलियन एम्बाप्पे
४३ मिलियन डॉलर्सच्या कमाईसह ‘पॅरिस सेंट-जर्मन’ क्लबचा हा खेळाडू चौथ्या स्थानावर आहे. २२ वर्षीय या फुटबॉलपटूला २८ मिलियन डॉलर्स इतके मानधन मिळते, तर १५ मिलियन डॉलर्सची त्याची कमाई ही जाहिरातींमधून होते.

 

३. नेमार
२९ वर्षीय फुटबॉलपटू नेमार ९५ मिलियन डॉलर्सच्या कमाईसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘पॅरिस सेंट-जर्मन’ क्लबचा हा खेळाडू ७५ मिलियन डॉलर्सच्या मानधनासह जाहिरातींद्वारे २० मिलियन डॉलर्स कमावतो.

फुटबॉल

२. लिओनेल मेस्सी
‘पॅरिस सेंट-जर्मन’ क्लब जॉईन केल्यानंतर मेस्सीची कमाई ११० मिलियन डॉलर्स इतकी झाली आहे. ३४ वर्षीय हा फुटबॉलपटू ७५ मिलियन डॉलर्स इतक्या मानधनासह जाहिरातींमधून ३५ मिलियन डॉलर्सची कमाई करतो.

 

१. ख्रिस्तियानो रोनाल्डो
‘मँचेस्टर युनायटेड’ क्लब कडून खेळणाऱ्या ३६ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोने लिओनेल मेस्सीला मागे टाकत या यादीत प्रथम स्थान पटकावले आहे. १२५ मिलियन डॉलर्सच्या त्याच्या कमाईमध्ये ७० मिलियन डॉलर्स इतके त्याचे मानधन असून ५५ मिलियन डॉलर्सची कमाई तो जाहिरातींद्वारे करतो.


हेही वाचा:

या भारतीय क्रिकेटपटूकडे आहेत स्वतःचे प्रायवेट जेट, किंमत जाणून फिरतील डोळे..!

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

आरसीबी (RCB) कोरोना वॉरियर्सला सलाम करते: कोहलीची टीम आयपीएल सामन्यात लालऐवजी पीपीई किटसह निळी जर्सी परिधान करेल. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here