क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

आयसीसी टी-२० वर्ल्डकप मध्ये पहिल्यांदाच खेळणार हे ७ खेळाडू


आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ साठी भारतीय क्रिकेट संघ तयार झाला आहे. या नव्या टीम मध्ये अनेक नव्या आणि तरुण खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. १५ जणांच्या टीममध्ये ७ खेळाडू असे आहेत जे पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप मध्ये सहभागी होतील.

केएल राहुल
इंग्लंडमध्ये पार पडलेल्या टेस्ट मॅच मध्ये भारतीय संघाने केलेल्या चांगल्या कामगिरीत केएल राहुलचा खूप मोठा वाटा आहे. २०१६ मध्ये राहुलने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. आजपर्यंत खेळलेल्या ४९ सामन्यांमध्ये त्याने १५५७ धावा केल्या आहेत.

ऋषभ पंत
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नंतर ऋषभ पंत ने यष्टिरक्षणाची जबाबदारी खूप उत्तम रीतीने सांभाळली आहे. २०१७ मध्ये त्यांने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. आजपर्यंत त्याने दोन अर्धशतकांसह ५१२ धावा करण्यात यश मिळवले आहे.

सूर्यकुमार यादव
यावर्षीच्या इंग्लंड बरोबरच्या सामन्यांमधून सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले आहे. ४ सामन्यांमध्ये मिळून त्याने दोन अर्धशतकं झळकावली आहेत.

Advertisement -

T20 World Cup 2021

ईशान किशन
लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ईशानला दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे.

अक्षर पटेल
२०१५ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केलेल्या अक्षरच्या नावावर १२ विकेट्स आहेत.

वरुण चक्रवर्ती
‘मिस्टरी स्पिनर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरुणने आतापर्यंत ३ सामन्यांमध्ये २ बळी घेतले आहेत.

राहुल चाहर
टीम इंडियाच्या नेहमीच्या स्पिनर युवेंद्र चहल ऐवजी राहुल चाहर ला यावेळी संधी देण्यात आली आहे.

 


हेही वाचा:

MI vs CSK live: थाला पुन्हा फेल! जीम्मेदारीच्या वेळी धोनीने टाकली स्वतःची विकेट,चाहते नाराज..

या भारतीय क्रिकेटपटूकडे आहेत स्वतःचे प्रायवेट जेट, किंमत जाणून फिरतील डोळे..!

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

आरसीबी (RCB) कोरोना वॉरियर्सला सलाम करते: कोहलीची टीम आयपीएल सामन्यात लालऐवजी पीपीई किटसह निळी जर्सी परिधान करेल. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here