जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

दोन हजार वर्षांपूर्वीच लिफ्टचा शोध या राजाने लावला होता..


विज्ञानविश्वातल्या संख्य-असंख्य शोधांनी मानवी जीवन सुखकर करून ठेवलंय. तंत्रज्ञानाच्या या युगात तर सगळंच ‘वन क्लिक’ वर उपलब्ध झालंय. परंतु हे ‘वन क्लिक’ काही एका दिवसात झालेलं नाही.

यासाठी हजारो वर्षे शेकडो मेंदू आणि हजारो हात कामाला लागले तेव्हा आपण आजचा ऐषोआराम अनुभवतोय. आज यातल्याच एका तंत्रज्ञानाच्या प्रवासाची गोष्ट सांगतो.

आता आपण एक बटन दाबलं की एका जागी उभे राहून विनासायास क्षणार्धात कित्येक मजले चढउतर करू शकतो..

लिफ्ट

हे सगळं ‘लिफ्ट’ अर्थात उद्वाहकाच्या संशोधनामुळं शक्य झालंय. आपल्याला हे आधुनिक संशोधन वाटत असलं, तरी रोमन लेखक आणि स्थापत्यशास्त्रज्ञ व्हिट्रुव्हिअस यांच्या नोंदीनुसार ग्रीक गणितज्ञ आर्किमिडिजनं ख्रिस्तपूर्व २२६ सालीच या संशोधनाची रुजवात केल्याचं आढळतं.

Advertisement -

एका मोठ्या पिंपाला मजबूत दोरखंड गुंडाळत आणि मनुष्यबळाच्या सहाय्यानं रहाट वापरून पहिल्यांदा असा प्रयोग करण्यात आला होता.प्राचिन रोममध्ये तळघरात, भुयारात लपवलेली साधनसामग्री एवढंच काय अगदी योद्धेही नियमितपणे माणसांच्या मदतीनं साखळंदड गुंडाळलेल्या भ्रामणीचा वापर करून वेळप्रसंगी बाहेर काढत असत.

स्पेन इस्लामिक राष्ट्र असताना अल मुरादी यांच्या ‘द बुक ऑफ सिक्रेट्स’ या पुस्तकात किल्ल्याचा बुरुज उध्वस्त करण्यासाठी उद्वाहक सदृश्य तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, असा उल्लेख सापडतो.

१७४३ साली पंधराव्या लुईनं त्याच्या राणीला आपल्या व्हर्सालिसच्या राजवाड्यातील तिसऱ्या मजल्यावर येण्यासाठी बांधलेल्या खुर्चीची योजना केली होती. एवढंच नाही तर खास पाहुण्यांना मेजवानी देण्यासाठी तो बांधलेल्या मेजचा वापरही करायचा, जी थेट भोजनगृहात प्रवेश करत असे.

१८९३ साली रशियन संशोधक इवान कुलिबिननं हिवाळी राजमहालात उद्वाहक बसवलं, अशी एक वदंता असली तरी उद्वाहकाचा एक आराखडा लिओनार्दो दा विंचीनं तयार केल्याचाही उल्लेख काही ठिकाणी सापडतो.

 

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मनुष्यबळाऐवजी वाफेचा वापर होऊ लागला, पण ओल असल्यामुळे दोरखंड तुटायची किंवा साखळदंड निसरडा होण्याची भिती होती, त्यामुळे हा प्रकार फारसा चालला नाही. अर्थात या सगळ्या तंत्रज्ञानाच्या प्रवाहानं औद्योगिक क्रांतीपश्चात जोरात वेग घेतला. उद्वाहकाचंही आधुनिकीकरण व्हायला लागलं.

१८५२ साली ‘एलिशा ग्रेव्ज ओटिस’ या उद्योजकानं आधुनिक सुरक्षित उद्वाहकाचं संशोधन केलं, ज्यामुळे दोरखंड किंवा साखळदंड तुटला तरी पडण्याची भिती कायमची गेली आणि ‘उर्ध्वाधर वाहतूक’ उद्योगात क्रांती झाली.

 

लिफ्ट

२३ मार्च १८५७ या दिवशी न्युयाॅर्क शहरातल्या हाऊवौट या इमारतीत ग्राहकांना उद्वाहकानं पाचव्या मजल्यावर पोहोचवलं गेलं. हा उद्नाहकाचा पहिला प्रयोग नसला तरी पहिला व्यावसायिक वापर होता..

१८८० साली जर्मन अभियंता आणि उद्योजक वर्नर वाॅन सिमेन्स यानं पहिलं विद्युत उद्वाहक सुरू केलं आणि ॲंटाॅन फ्रीस्लरनं यातले दोष दूर करून उद्वाहकाचा उद्योगच सुरू केला. ही परंपरा पुढे सुरूच राहिली. सुरक्षिततेचे मापदंड जसे तीव्र होत गेले तसे उद्वाहकातही बदल होत गेले.

भारतात सर्वप्रथम १८९२ साली कोलकात्याच्या राजभवनात पहिलं उद्वाहक बसवलं गेलं होतं. साल १९०० उजाडेपर्यंत उद्वाहक पूर्णतः स्वयंचलित झालं, तरी लोकं याचा वापर करायला घाबरत. मला आजही ‘क्लाॅस्ट्रोफोबिक’ अर्थात उद्वाहकाचा भयगंड असणारे अनेक रुग्ण नेहमी भेटतात.

आजकाल तर इमारती इतक्या उंच होऊ लागल्यात की चालत जाऊन वरच्या मजल्यावर जाणं अशक्यप्राय वाटावं. दिड बिलियन डाॅलर्सचा चुराडा करून बनवलेल्या ‘बुर्ज खलिफा’ नामक जगप्रसिद्ध इमारतीस तब्बल १६८ मजले आहेत आणि इमारतीला एकूण ५८ उद्वाहक बसवलेत.

जर हे उद्वाहक नसते तर ही इमारत बांधण्याची साधी कल्पनाही करता आली नसती. आपल्याकडं तर प्रियकरही प्रेयसीला ‘उॅंची हैं बिल्डिंग लिफ्ट तेरी बंद हैं’ म्हणत आपली समस्या सांगत असतो.

काही दिवसांपूर्वीच न्युयाॅर्कमधल्या वस्तूभांडाराच्या इमारतीत ‘एलिशा ओटिस’ यांनी जगातलं पहिलं सुरक्षित उद्वाहक बसवलं होतं, त्या निमित्तानं सहज हा आढावा..

 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here