म्हाताऱ्या भाईजानचे अतिउत्साही चाहते, सिनेमागृहात फोडले फटाके; गुन्हा दाखल..


सलमान खानचा (Salman Khan) ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ (Antim: The Final Truth) सिनेमा देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकत आहे. प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन सुपरस्टार सलमानचा ‘अंतिम’ सिनेमा बघत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानच्या कामाचे कौतुकदेखील करत आहेत. अशातच काल मालेगावच्या सुभाष चित्रपटगृहात अंतिम सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दरम्यान चाहत्यांनी चित्रपटगृहात गोंधळ घालत फटाक्यांची आतिषबाजी केली आहे.

सलमान खानचा अंतिम सिनेमा काल मालेगावच्या सुभाष चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. दरम्यान शेवटच्या शो दरम्यान सलमानच्या चाहत्यांनी रात्री चित्रपटगृहात गोंधळ घालत फटाक्यांची आतिषबाजी केली.

सिनेमागृह

या संपूर्ण प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. या प्रकरणी छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेले आहे. काही महिन्यांपूर्वी जॉन अब्राहमचा मुंबई सागा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यावेळीदेखील अशाच प्रकारची हुल्लडबाजी होऊन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती.

फटाक्यांच्या आतिषबाजीवर सलमान खानने चाहत्यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून विनंती केली आहे,”सिनेमागृहात फटाके घेऊन जाऊ नका. आगीमुळे तुमच्यासह इतरांचादेखील जीव धोक्यात येऊ शकतो. माझी थिएटर मालकांना विनंती आहे, फटाके सिनेमागृहात नेण्यास परवानगी देऊ नये. सिनेमाचा आनंद घ्या. पण सिनेमागृहात फटाक्यांची आतिषबाजी करणं कृपया टाळा”.


===

Advertisement -

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

[email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here