जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

 

बिग बॉस 15 रिऍलिटी शोमध्ये जय भानुशाली घेत आहे सर्वाधिक फी, जाणून घ्या तुमच्या आवडत्या स्पर्धकांची कमाई….

 

 

Advertisement -

बिग बॉस 15 चा नवीन सीझन सुरू होऊन काही दिवस झाले आहेत आणि घरात गोंधळ सुरू झाला आहे. बिग बॉसच्या या सीझनमध्ये दररोज नवीन ट्विस्ट येत आहेत. स्पर्धकांमधील लढाई प्रेक्षकांना आवडत असताना, तेजस्वीची नखरा करणारी शैली लोकांची मने जिंकत आहे. या सीझनची खास गोष्ट म्हणजे या वेळी अनेक मोठे कलाकार या शोमध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये जय भानुशाली ते करण कुद्रा आणि शमिता शेट्टी यांच्या नावांचा समावेश आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की या शोमध्ये दिसल्यानंतर स्पर्धकांना प्रसिद्धीबरोबरच संपत्तीही मिळते. या सेलेब्स शोचा एक भाग होण्यासाठी भरमसाठ फी आकारत आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या स्पर्धकाची फी या मोसमात सर्वाधिक आहे.

 

 

जय भानुशाली :

टीव्ही अभिनेता आणि होस्ट जय भानुशाली या मोसमातील सर्वात महागडा स्पर्धक म्हणून ओळखला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तो दर आठवड्याला 11 लाख रुपये घेत आहे. म्हणजे त्याची रोजची फी सुमारे 1.65 लाख रुपये आहे.

 

 

तेजस्वी प्रकाश :

बिग बॉस 15 मध्ये जय भानुशाली नंतर तेजस्वी प्रकाश सर्वाधिक पैसे मिळवत आहे. तिला दर आठवड्याला 10 लाख रुपये मिळत आहेत, म्हणजेच ती दररोज सुमारे 1.50 लाख रुपये घेत आहे.

 

 

करण कुंद्रा :

अभिनेता आणि होसेट करण कुंद्रा यांनाही बिग बॉसकडून मोठी रक्कम मिळाली आहे. अहवालांनुसार, तो दर आठवड्याला 8 लाख रुपये म्हणजेच दररोज सुमारे 1.20 लाख रुपये घेत आहे.

 

 

 

शामिता शेट्टी :

बिग बॉस ओटीटी मध्ये आपला प्रवास पूर्ण करणारी शमिता शेट्टी देखील बिग बॉस 15 चा भाग आहे. ततिला दर आठवड्याला 5 लाख रुपये मिळतात, म्हणजेच तिला दररोज 70 हजार रुपये मिळत आहेत.

 

 

 

अकासा सिंह :

अकासा सिंहला बिग बॉसमध्ये प्रत्येक आठवड्यासाठी 5 लाख रुपये दिले जात आहेत, म्हणजेच त्यांना दररोज 70 हजार रुपये मिळत आहेत.

 

 

डोनल बिश्त :

अभिनेत्री डोनल बिश्तला बिग बॉसमध्ये दर आठवड्याला 4 लाख रुपये मिळत आहेत. याचा अर्थ त्यांना दररोज सुमारे 50 हजार रुपये मिळतात.

 

 

 

विधी पंड्या :

विधी पंड्याला आठवड्याला 4 लाख रुपये दिले जातात, याचा अर्थ त्यांना दररोज 50 हजार रुपये मिळतात.

 

 

उमर रियाज :

असीम रियाजचा भाऊ उमर रियाजला दर आठवड्याला 3 लाख रुपये म्हणजेच दररोज सुमारे 40 हजार रुपये मिळत आहेत.

 

 

प्रतीक सहजपाल :

बिग बॉस ओटीटीची माजी स्पर्धक प्रतीक सहजपाल यांना दर आठवड्याला 2 लाख रुपये, म्हणजे दररोज 30 हजार रुपये दिले जात आहेत.

 

 

ईशान सहगल :

इशान सहगलला आठवड्यासाठी 2 लाख रुपये दिले जात आहेत, म्हणजेच दिवसाचे 30 हजार दिले जातं आहेत.

 

 

निशांत भट्ट :

बिग बॉस ओटीटीचा पहिला उपविजेत्या निशांत भटला देखील 2 लाख रुपये, म्हणजे दररोज 30 हजार रुपये दिले जात आहेत.

 

 

मिशा अय्यर :

मिशा अय्यरला आठवड्यातून 2 लाख रुपये मिळतात, म्हणजे दररोज सुमारे 30 हजार रुपये.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

हेही वाचा:

 

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

 

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

 

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here