जगभरातील महत्वाच्या बातम्या आणि लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

डोगरदरीत वसलेल्या या गावाला स्वतःचा वेगळा असा सूर्य आहे, त्यातूनच मिळतो गावकर्यांना सूर्यप्रकाश..!


पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचा विचार करूनही मानवाने थक्क व्हावे. मग ते सहारा वाळवंट असो की अमेरिकेची डेथ व्हॅली. या दोन उष्ण ठिकाणीही मानव जगायला शिकला आहे. या ठिकाणी त्यांचे अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे. कुठेतरी माणूस डोंगराच्या पायथ्याशी राहतो. कठीण परिस्थितीतही माणसाने अडचणींना सामोरे जात जगण्यास सुरवात केली आहे.

अशीच एक जागा म्हणजे विग्नेला.

हेही वाचा:  वाचून आच्छर्य वाटेल पण, गेल्या 70 वर्षापासून या गावात कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये..!

विग्नेला  इटलीच्या मिलान शहराच्या उत्तरेस 130 किमी अंतरावर, खोल दरीत तळाशी वसलेले आहे. हि जागा पूर्णपणे डोंगरांनी वेढलेला आहे. टेकड्यांमुळे उन्हाळ्याच्या दिवसातही तिथे संध्याकाळ लवकर होते. हिवाळ्यात तिथली परिस्थिती बिकट होत जाते आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत इथे सूर्यकिरण येत नाहीत.

Advertisement -

 

विग्नेलाची लोकसंख्या सुमारे 200 आहे आणि गावातील लोकांचा असा विश्वास आहे की येथे सूर्य 11 नोव्हेंबरच्या सुमारास अदृश्य होतो आणि 2 फेब्रुवारीपूर्वी दिसत नाही. ही परिस्थिती अगदी सायबेरियासारखी असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे.

शतकानुशतके लोक या गावात राहतात आणि त्यांनी ते त्यांचे भाग्य म्हणून स्वीकारले. पण नंतर काही स्थानिक अभियंते आणि वास्तुविशारदांनी एक उत्तम उपाय शोधला. गावात सूर्यप्रकाश परावर्तित व्हावा म्हणून त्यांनी डोंगराच्या माथ्यावर मोठा आरसा लावला  त्यामुळे तो सूर्यासारखा दिसतो आणि गावात सूर्यकिरण परावर्तीत करतो.

या गावासाठी सूर्याच काम करणाऱ्या या आरश्याला गावकरी आपला सूर्यच समजतात. गेल्या अनेक वर्षापासून त्या नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये त्यांना याच सुर्याद्वारे सूर्यप्रकाश मिळतो.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

हा क्रूर सिरीयल किलर फक्त वयात आलेल्या मुलींनाच मारायचा, मृत्यूनंतर करायचा शरीराचे तुकडे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here