आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

प्रत्येक व्यक्ती चे स्वप्न असते की आपल्याला बंगला पाहिजे बंगल्यासमोर लावायला चार चाकी गाडी पाहिजे तसेच सर्व सुखाच्या आणि चैनीच्या वस्तू हव्या आणि जीवन हे ऐशोआरामचे असावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते.

या सर्व गोष्टी जर तुम्हाला उपभोगायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे बक्कळ।पैसा असणे आवश्यक आहे. आजच्या काळात पैश्याला खूप महत्व आहे. आजच्या युगात जर का तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला या जगात कोणच किंमत देणार नाहीत. त्यासाठी आपले जीवन सुखकर घालवण्यासाठी आपल्याकडे बक्कळ पैसा असणे गरजेचे आहे.

पैसा
पैसा

पैसे कमवण्यासाठी प्रत्येकाला कष्ट करावे लागते तसेच काही वास्तू च्या गोष्टी आणि घरातील वातावरण आणि वस्तूंची ठेवण यावर सुद्धा लक्ष देणे खूप।महत्वाचे आणि गरजेचे आहे. घरात कोणती गोष्ट कोठे ठेवायची तसेच घराची दारे कोणत्या दिशेला असावी याची सुद्धा पूर्णपणे चौकशी करावी.

जर का तुम्हाला बक्कळ पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला या गोष्टी अमलात आणल्या पाहिजेत.

Advertisement -

1)घरात कोणत्याही हिंसक तसेच जंगली प्राणी पक्षी, वेगवेगळ्या पेंटिंग अजिबात लावू नये या मुळे घरातील वातावरण हे तणावाचे निर्माण होते तसेच घरात भांडणे लागतात आणि घरात लक्ष्मी वास करत नाही यासाठी घरात अश्या प्रकारचे फोटो किंवा पेंटिंग लावणे टाळावे.

2)सकारात्मकता:- घरातील व्यक्तींमध्ये आणि तुमच्यामुळे सकारात्मक विचार असणे खूप गरजेचे असते. तसेच घरामध्ये हसऱ्या व्यक्तींच्या पेंटिंग लावणे अधिक चांगले समजले जाते

दररोज वेगळा दिवस आणि वेगवेगळ्या घटनांमधून माणूस आपले जीवन व्यतीत करत असतो. मात्र, घरातील अनेक गोष्टी माणसाला सकारात्मक आणि आशावादी राहण्यासाठी उपयुक्त ठरत असतात.

वास्तुशास्त्रानुसार, घरात हसर्‍या चेहर्‍यांची तसबीर लावणे फायदेशीर मानले जाते. अशा तसबिरींमुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमभाव वाढीस लागतो. नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते. यामुळे एकूण कौटुंबिक वातावरण उत्तम राहते. मानसिक प्रसन्नता लाभते. कुटुंबातील सदस्य आनंदी राहण्यास या प्रकारच्या तसबिरी सहाय्यक ठरतात, असे सांगितले जाते.

3)दीर्घायुष्य
कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य उत्तम राहून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, असे सर्वांनाचा वाटत असते. जो-तो आपापल्या परिने आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here