झाड

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

सावधान! या झाडाला जर तुम्ही स्पर्श केला तर जाऊ शकतो जीव.!


आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या घराच्या आसपास चांगले वातावरण असावे म्हणून जास्तीत जास्त वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडे लावतो, फक्त ही झाडे आपल्यासाठी नाहीत तर आपले पर्यावरण सुद्धा शुद्ध राहावे यासाठी लावतात.

तुम्हाला तर माहीतच आहे की आपले अस्तित्व आहे ते फक्त या झाडांमुळे आहे. झाडांमुळे आपल्याला कागद, फर्निचर तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपणाला ऑक्सिजन भेटतो. पण तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की आपल्या पर्यावरणात अशी काही झाडे आहेत जी मानव जातीसाठी खुप खतरनाक आहेत, या झाडांमुळे मानवाचा जीव सुद्धा जाऊन शकतो.

झाड

हे झाड लंडन मध्ये पाहायला भेटते ज्या झाडाला तिकडचे लोक होगवीज किंवा किलर ट्रि असे म्हणतात. या झाडाचे वैज्ञानिक नाव हेरकिलम मेंटागेजिएनम आहे. किलर ट्रि ब्रिटनच्या लंकाशायर नदीच्या किनाऱ्यावर पाहायला भेटते.

किलर ट्रि ची उंची १५ फूट असते, जर व्यक्तीने या झाडाला हात लावला तर त्याच्या हातावर फोड येण्यास सुरुवात होते. वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की जेव्हा तुम्ही या झाडाला हात लावाल तेव्हापासून ४८ तासाच्या आत तुमच्या शरीरावर याचा प्रभाव पडायला सुरू होईल. हे झाड दिसायला जेवढे सुंदर तेवढेच घातक सुद्धा असते.

वैज्ञानिकांच्या शोधानुसार हे झाड सापाच्या विषापेक्षा सुद्धा घटक आहे, जर तुम्ही या झाडाला हात लावला तर काही तासातच तुम्हाला जाणवेल की तुमच्या त्वचेवर खाज चालू झाली आहे.

तसेच डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की जर तुम्ही या झाडाला स्पर्श केला तर तुमच्या डोळ्यांची नजर पूर्ण कमी होईल आणि यावर अजून कसलेच औषध तयार झाले नाही. या झाडामध्ये एक रसायन असते त्या रसायनाला सेंसआइजिंग फूरानोकौमारिंस असे म्हणतात, या रसायनामुळे हे एवढे विषारी आणि खतरनाक झाड असते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here