जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

हे आहे जगातील आगळेवेगळे रेस्टॉरंट जिथे बोलण्यावर बंदी आहे, जाणून घ्या कारण..


आंपण नेहमी या जगात वेगळ्या वेगळ्य रेस्टोरेंट बद्धल ऐकून आहे, काही रेस्टोरेंट पाण्याच्या आता आहेत जिथे लोक जेवण करण्यासाठी जातात. आज आम्ही तुम्हाला अशा एका रेस्टोरेंट बद्धल सांगणार आहोत ज्यामध्ये बोलण्यावर बंदी आहे फक्त तुम्ही हातांचे इशारे करून तुम्हाला जे खायचे किंवा प्यायचे आहे त्याची ऑर्डर देऊ शकता.

रेस्टॉरंट

चीन मधील ग्वांगझू मध्ये हे रेस्टॉरंट चालू आहे हे एक वेगळ्याच प्रकारचे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंट ची सुरुवात स्टारबक्स ने केली होती. या रेस्टॉरंट ला सायलेंट कॅफे नाव दिले आहे, चीन मधील हे एक असे रेस्टॉरंट आहे ज्यामध्ये तुम्ही न बोलता ऑर्डर दयायची असते. या रेस्टॉरंट ची एक खास गोष्ट आहे की इथे ग्राहक न काही बोलता ओर्डर देऊ शकतात. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही हातांच्या इशारे ने मेनू कार्ड मधील नंबर सांगायचं आणि काही क्षणातच तुमची ऑर्डर तयार असते.

या रेस्टॉरंट मध्ये असा एक खास प्रकार दिला आहे जो की तुम्ही जी हाताच्या इशाराने ऑर्डर देणार आहे ती जर कोणत्या कर्मचाऱ्याला समजत नसेल तर तिथे नोटपॅड सुद्धा उपलब्ध आहे त्यावरती तुम्ही लिहून देऊ शकता, तसेच तिथे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये डिजिटल सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. हे रेस्टॉरंट असे बनवायचे कारण असे आहे की ज्या लोकांना ऐकायला येत नाही किंवा ज्यांना बोलता येत नाही त्यांना आपण समजू शकू.रेस्टॉरंट

या रेस्टॉरंट मध्ये ३० कर्मचारी काम करत आहेत, ज्यामध्ये १४ कर्मचारी असे आहेत त्यांना ऐकायला येत नाही. या रेस्टॉरंट मध्ये अशी व्यवस्था केली आहे की जे लोक असे आहेत ज्यांना ऐकायला येत नाही त्या लोकांना आपण मदत करून भविष्यात नोकरी मिळविणे देऊ शकतो.

Advertisement -

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here