जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा

===

सकाळी झोपेतून उठल्यावर चुकुनही पाहू नका ह्या गोष्टी, संपूर्ण दिवस होऊ शकतो खराब….!


वास्तुशास्त्रानुसार सकाळी काही खास गोष्टींची काळजी घ्यायला हवी.  दिवसाची सुरवात चांगली व्हावी आणि आपला दिवस आनंदात जावा असं वाटत असल्यास  वास्तूशास्त्रात सांगितलेल्या ह्या गोष्टी जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. चला जाणून घेऊया सकाळी कोणत्या गोष्टी पाहण्यास मनाई आहे.

आरशाकडे पाहू नका: सकाळी उठल्यानंतर आधी आरशाकडे पाहू नये. कारण आरशात बघून तुम्ही संपूर्ण रात्रीची नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचता आणि दिवसभर नकारात्मक ऊर्जा तुमच्या विचारांमध्ये राहते. त्यामुळे कोणत्याही कामात तुमचे मन लागत नाही.

घाण भांडी :  रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व घाण भांडी स्वच्छ करून झोपा. कारण सकाळी घाण भांडी पाहिल्याने तुम्हाला अशुभ संदेश मिळू शकतो आणि तुमचा संपूर्ण दिवस तणावाखाली जाऊ शकतो. त्यामुळे शक्य असल्यास रात्री भांडी साफ केल्यानंतरच झोपावे.

सकाळी

Advertisement -

सावली पाहू नका : सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा दुसऱ्याची सावली पाहू नका. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला सावली दिसली तर त्याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो आणि तुम्हाला दिवसभर तणाव, भीती, राग जाणवतो. म्हणूनच अंथरुणातून उठल्यानंतर सावली कधीही पाहू नका.

बंद घड्याळ : वास्तुशास्त्रानुसार सकाळी बंद घड्याळाकडे पाहू नये. याशिवाय सकाळी सुया, धागे  पाहू नयेत. या गोष्टी अशुभ मानल्या जातात. सकाळी उठल्यावर ते पाहून तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो.

सकाळी उठल्यावर काय पहावे?

सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तळहाताकडे पाहणे चांगले असते आणि गायत्री मंत्र किंवा इतर कोणत्याही मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. तसेच बिछान्यातून उठल्यावर देवाचा फोटो, मोराचे डोळे, फुले इत्यादी सकारात्मक गोष्टी दिसतात, तर तुमचा दिवस चांगला जातो.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here