आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आंबा किंवा आंबरस म्हणले की आपल्या तोंडाला आपोआप पाणी सुटते, हे एक अस फळ आहे जे आपण कच्चे असण्यापासून ते पक्के होईपर्यंत खातो. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तिसुद्धा आंब्याचे दिवाने आहेत. आंबा खाण्याने आपल्या शरीरातील रक्त वाढते तसेच कोणतेही आजार सुद्धा होत नाहीत पण जर तुम्ही जास्त प्रमाणात आंबा खात असाल तर तुम्हाला मधुमेह होऊ शकतो. तसेच अशा काही गोष्टी आहेत जे आंबा खाल्यावर तुम्ही अजिबात खाऊ नका नाहीतर याचे परिणाम वाईट होतात.

 

आंबे खाल्ल्यानंतर
आंबे खाल्ल्यानंतर

१. पाणी –

पाणी जे आपण काही जरी खाल्ले तरी पितो पण आंबा खाल्यावर आजिबात पाणी पिऊ नका कारण यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागेल जसे की गॅस, अपचन आणि काही वेळेस तर तुमच्या आतड्यांवर सूज सुद्धा निर्माण होते त्यामुळे पाणी पिऊ नका. जास्त तहान लागली असेल तर अर्ध्या तासाने तुम्ही पाणी पिऊ शकता पण लगेच पाणी पिऊ नका.

२. कोल्ड्रिंक्स –

कोल्ड्रिंक्स चे आपल्याकडे खूप लोक चाहते आहेत पण जर आंबा खाल्ला आणि त्यावरून कोल्ड्रिंक्स किंवा कोणताही ज्युस घेतला तर आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढते आणि मधुमेह होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे तुम्ही आजिबात कोल्ड्रिंक्स पिऊ नका.

३. दही –

दही जे आपण रोजच्या आहारात घेतो पण ज्यावेळी आंबा किंवा आंबरस आपण आहारात घेऊ त्यावेळी तुम्ही दही खाऊ नका, कारण दही खाल्याने आपल्या शरीरात कार्बन डायॉक्साईड चे प्रमाण वाढते त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागेल त्यामुळे लगेच दही खाऊ नका. कमीतकमी आंबा खाल्यानंतर १ तासाने दही खा.

४. कारले –

कारले आपल्या शरीरासाठी चांगले असते कमीतकमी आठवड्यातून १-२ आपल्या आहारात असावे पण जेव्हा आंबा खात असू आणि त्यावेळी कारल्याचे सेवन करू त्यावेळी तुम्हाला मळमळणे तसेच उलटी होणे असा त्रास जाणवू शकतो त्यामुळे तुम्ही कारले खाऊ नका.

५. मसालेदार पदार्थ –

आंबा खाल्यानंतर तुम्ही तिखट पदार्थ किंवा ज्यामध्ये जास्त मसाला असेल असे पदार्थ खाऊ नका कारण त्यामुळे तुम्हाला त्वचेचे आजार किंवा पोटाचे आजार होऊ शकतात.

६. साखर –

आंबा हा खूप गोड प्रमाणात असतो, आणि आपण जास्त प्रमाणात आंबा खाला तर मधुमेह होऊ शकतो त्यामुळे कोणतेही गोष्ट आपण प्रमाणात खाली पाहिजे तसेच जर तुम्ही साखर खाली तर मधुमेह सोबत हृदयसंबंधी आजार होतात त्यामुळे तुम्ही साखर खाणे टाळा. यावरून असे लक्षात येते की आंबा खाल्याने काही पदार्थ आपल्याला खाणे टाळले पाहिजे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here