आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

बाहेर कुठे ही फिरायला गेल्यावर प्रत्येक व्यक्ती काही न काही खातच असते. यामध्ये सर्वात जास्त फास्टफूड खाल्ले जाते. त्यामध्ये वडापाव, समोसा,कचोरी, इत्यादी नमकीन पदार्थ आपण आवडीने खात असतो.

वडापाव
वडापाव

रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांवर किंवा एखाद्या खाऊ गल्ली मध्ये आपण या पदार्थाचे सेवन करत असतो. बऱ्याच वेळा आपण पाहिले सुद्धा असेल की हातगाडे वाले वडापाव समोसा किंवा भेळ ही वर्तमान पेपर वर खायला देतात तर काही प्रिंटेड कागदी प्लेट मध्ये देतात.

हे पदार्थ खायला जरी चवदार आणि लज्जत असले तरी हे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत. तसेच वर्तमान पत्रावर हे पदार्थ घेऊन खाणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाचा.

सध्या राज्य सरकारने वडापाव वर्तमान पत्रावर खाण्यास बंदी घातली आहे. बरेच लोक विचारात पडले असतील की का बरं, काय असेल या मागील कारण इत्यादी गोष्टींचा ते विचार करत बसले असतील.

Advertisement -

तर मित्रांनो वर्तमान पत्र प्रिंटिंग करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल चा आणि वेगवेगळ्या शाई चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जर का आपण वर्तमान पत्रावर गरम वडापाव खाल्लं तर गरम तेलामुळे आणि पेपर वरील केमिकल आणि रासायनिक रंगामुळे त्यांचा अंश हा त्यावरील पदार्थावर होतो.

आणि हे आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. तसेच यापासून आपणाला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. बऱ्याच वेळी केमिकल मुले मानवी कॅन्सर ची सुद्धा भीती जाणवू लागते.

त्यासाठी बाहेर कोठे ही गेला तर वडापाव, भजी आणि समोसा यासारखे तसेच इतर गरम पदार्थ वर्तमानपत्रावर घेऊन खाऊ नये. तसेच हे आपल्या आरोग्यासाठी खूप अपायकारक आहे.

यातून आपल्याला वेगवेगळ्या आजारांची आणि रोगांची लागण होऊ शकते त्यामुळे सावधानी म्हणून सरकारने वर्तमान पत्रावर पदार्थ खाण्यास बंदी घातली आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here