आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

 

 

नमस्कार मित्रांनो आज या लेखात आम्ही तुम्हाला खूप जोराची भूक लागल्यावर कोणत्या गोष्टींच सेवन करू नये या विषयी माहिती सांगणार आहोत.

Advertisement -

मित्रांनो दैनंदिन आहार जर का आपण योग्य वेळी घेतला तर आपल्या शरीराची कोणत्याच प्रकारची हानी होत नाही. हे आपल्या सर्वानाच चांगलंच माहीत आहे. परंतु जर का तुम्ही अयोग्यवेळी जर अयोग्य आहार घेतला तर तुमच्या शरीराला कोणत्याच प्रकारचे नुकसान होत नाही.

जेव्हा आपण एखादा पदार्थ खातो तेव्हा तुम्ही ते पदार्थ प्रमाणात खाल्ले पाहिजेत. नाही तर तुम्हाला पोटाचे अनेक विकार झाल्याशिवाय राहणार नाही.

 

रिकाम्या पोटी
रिकाम्या पोटी

जर आपल्याला जोराची भूक लागेलं तेव्हा आपण जरी कोणतेही काम करायचं म्हटलं तरी आपलं लक्ष कामावर लागत नाही. कारण आपलं सगळं लक्ष जेवणावर असते.

जोरदार कडाक्याची भूक लागल्यावर या पदार्थाचे सेवन केल्यावर तुम्हाला यापासून धोका निर्माण होऊ शकतो.

1) पेरू:- थंडीच्या दिवसात जर तुम्हाला खूप भूक लागली असेल आणि त्यावेळी तुम्ही पेरूं खाल्ले तर तुम्हाला पोटदुखी चालू होईल. त्याचबरोबर उन्हाळा असताना पेरू खाल्ल्यास कोणत्याच प्रकारचा अपाय होत नाही. फक्त पेरू खाल्ल्यावर पाणी अजिबात पिऊ नये.

2) सफरचंद:- हिवाळा ऋतूमध्ये उपाशीपोटी सकाळी सफरचंद खाल्ले तर तुम्हाला बीपी चा त्रास होऊ शकतो त्यामुळे उपाशीपोटी सफरचंद खाऊ नये. इतर वेळेत सफरचंद खाल्ल्यास काही इजा होत नाही.

3) दही :-तुम्ही दही कोणत्याही वातावरणात खाऊ शकता, पण थंड वातावरणातदही खाल्ल्यावर तुम्ही आजारी पडू शकता, त्यामुळं शक्यतो दही खान टाळावे

4) टोमॅटो :- टोमॅटो फळ हे खूप उष्ण असते त्यामुळे उन्हाळ्यात जर तुम्ही जास्त टोमॅटो खाल्ले तर तुमच्या छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. तसेच हिवाळा ऋतूमध्ये खाल्ल्यास शरीराला गरम ठेवायचे काम करते. परंतु जास्त प्रमाणात खाल्ल्यास डोक्यावरील केस गळण्याचे प्रमाण वाढते.

5) लिंबू:- लिंबू खाणे आरोग्यासाठी चांगले असते कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते परंतु जर का तुम्ही थंड वातावरणात लिंबू खाल्ले तर तुम्हाला खोकला तसेच घसा कोरडा पडणे अशा प्रकारच्या समस्या उदभवू शकतात.

6) याचबरोबर आपण चिप्स खातो नंतर कॉफी पिणे, कच्या भाज्या, कोल्ड्रिंक्स, मसालेदार पदार्थ आणि वेगवेगळे ज्युस असे पदार्थ उपाशीपोटी खाल्यास आपण आजारी पडू शकतो. त्यामुळं उपाशीपोटी या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here