रविवारी चुकून सुद्धा या गोष्टी करू नये,नाहीतर घरात येईल दारिद्र्य!


प्रत्येकाच्या जीवनात काही न काही अडचणी असतात, जे की घरामध्ये शांतता नसते सतत काही न काही वाद विवाद चालू असतात आणि त्यामुळे आपल्या जीवनातील शांतता पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर गेलेली असते, आणि या सर्वाला कारणीभूत आहे ती म्हणजे तुमच्या कुंडलीतील रवी ग्रहाची स्तिथी.

sun and venus conjunction how will it affect a common man know here | Sun  and Venus Together: सूर्य और शुक्र की युति का मतलब क्या है, इन ग्रहों के  साथ आने

जर तुमच्या कुंडलीत जर रवी ग्रह नीट नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे तुम्ही अनेक ग्रहांची शांतता करत असतात, आज आम्ही तुम्हाला हेच सांगनार आहोत की नक्की तुम्ही काय केले पाहिजे त्यामुळे रवी ग्रह तुमच्या कुंडलीत स्थित राहील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही रविवारी या गोष्टी करणे थांबवल्या पाहिजेत म्हणजे तुम्हाला वाईट समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

रविवारच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाला आजिबात पाणी घालू नका कारण त्यादिवशी पाणी घालणे अपवित्र मानले जाते पण या उलट तुम्ही पिंपळाला धूप, अगरबत्ती इ. गोष्टी लावू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे रविवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून सूर्याला जल अर्पण करावे.

रविवार

पण ते जल तांब्याच्या कलशात घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू आणि तांदूळ असावे. असे केल्याने सुर्यग्रह आपल्याला आशीर्वाद देऊन आपल्याला शक्ती प्राप्त होण्यास मदत होते. तसेच रविवारी तुम्ही केस कापणे तसेच केसाला तेल लावणे टाळले पाहिजे, सोबत तुम्ही तिळाचे तेल सूर्याला अर्पण करा त्यामुळे तुमच्या जीवनात येणारी संकटे आपोआप दूर निघून जातील.

Advertisement -

अत्ता आपण पाहू की रविवारी कोणती गोष्ट खाऊ नये, तर रविवारी मसुरीची डाळ आजिबात खाऊ नये. रविवारी मसुरीची डाळ खाणे सुर्यदेवला चालत नाही, जर तुम्ही सुर्यदेवाची प्रार्थना करत असाल तर मसुरीची डाळ आजिबात खाऊ नका नाहीतर तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागेल. तसेच कांदा लसूण खाणे टाळले पाहिजे आणि शक्यतो रविवारी संध्याकाळी उपवास करावा.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here