क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

मुंबई विरुद्ध उद्याच्या सामन्यासाठी असा असू शकतो चेन्नई सुपर किंग्जसाठी संभाव्य संघ,जिंकण्याचा दृढनिश्चय..


आता आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होण्यासाठी काउंटडाउन सुरू झाले आहे. स्पर्धेची सुरुवात एका उच्च-व्होल्टेज सामन्याने होणार आहे,ज्यामध्ये पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचा सामना महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.

यावेळी CSK साठी सर्वात मोठी चिंता म्हणजे त्यांचा स्टार सलामीवीर फाफ डू प्लेसिस दुखापतीशी झुंज देत आहे, ज्यामुळे तो पहिला सामना चुकवू शकतो. त्याचबरोबर बुधवारी दुबईला पोहोचलेला इंग्लिश अष्टपैलू खेळाडू सॅम करणही पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाहीये. इंग्लंडवरून आलेल्या प्रत्येकाला ६ दिवस अलग विलगीकारणात रहावच लागेल असा नियम आहे. त्यामुळे करण उद्याचा सामना खेळू शकणार नाही.

अश्या परिस्थितीत या संभाव्य अकरा खेळाडूंसह कर्णधार धोनी पहिल्या सामन्यात मैदानात उतरण्याचा निर्णय घेऊ शकतो.

उथप्पाला सलामीची जबाबदारी मिळू शकते.

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात फाफ डू प्लेसिसने ऋतुराज गायकवाडसोबत चांगली सलामीची जोडी तयार केली आणि संघाला चांगली सुरवात देण्याची जीम्मेदारीही पार पाडली. अशा परिस्थितीत फाफच्या अनुपस्थितीमुळे रॉबिन उथप्पा प्रथमच पिवळ्या जर्सीमध्ये मैदानावर खेळताना दिसू शकतो.

Advertisement -

चेन्नई सुपर किंग्ज

उथप्पाला गायकवाडसोबत सलामीवीर म्हणून पाठवता येईल. इंग्लंडचा फिरकी गोलंदाजीचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे तर सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. अंबाती रायडूने संघाच्या मधल्या फळीत सातत्याने चांगली कामगिरी केली आणि सर्वांना प्रभावित केले.

संघात अष्टपैलू म्हणून पूर्वार्धात छाप पाडणारा रवींद्र जडेजा प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

संघाचा इंग्लिश अष्टपैलू बुधवारीच दुबईत दाखल झाला आहे आणि दुबईच्या सहा दिवसांच्या अलग ठेवण्याच्या नियमांमुळे त्याला पहिल्या सामन्यात भाग घेणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत धोनी त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडला संघात समाविष्ट करू शकतो.

गेल्या काही मालिकांमध्ये हेझलवुडची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे आणि पुन्हा एकदा तो दीपक चाहरसह पॉवरप्लेमध्ये कहर निर्माण करू शकतो. त्याच्याशिवाय अलीकडेच झालेल्या इंग्लंड मालिकेत छाप पाडणारा शार्दुल ठाकूरही संघात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. शेवटचा खेळाडू म्हणून लुंगी एनगिडी किंवा इम्रान ताहिर यांना संधी मिळू शकते.

चेन्नई सुपर किंग्जसाठी संभाव्य प्लेइंग 11

ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेजलवुड, लुंगी एनगिडी/इम्रान ताहिर.


हेही वाचा:

या भारतीय क्रिकेटपटूकडे आहेत स्वतःचे प्रायवेट जेट, किंमत जाणून फिरतील डोळे..!

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

आरसीबी (RCB) कोरोना वॉरियर्सला सलाम करते: कोहलीची टीम आयपीएल सामन्यात लालऐवजी पीपीई किटसह निळी जर्सी परिधान करेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here