आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या शहरांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही ,शास्त्रज्ञांनी सांगितलं ‘हे’ मोठं कारण


कोरोनाच्या दोन लाटांनी भारतात असंख्य लोकांचे प्राण घेतले. त्यामुळे अनेक राज्यांना लाॅकडाऊन करावं लागलं. पहिल्या लाटेत शहरी भागांना कोरोनाने झोडपलं. त्यानंतर दुसऱ्या लाटेत शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातलं. आता सप्टेंबर मध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसणार असल्यानं गावं कोरोना मुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.कोरोना

तज्ज्ञांच्या मते जागतिक स्तरावर कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचं प्रमाण फक्त एक टक्के आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं होतं. त्यामुळे या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव इतका होता की तिसरी लाट येण्याची शक्यता कमीच आहे, असं एनटीएजीआयचे अध्यक्ष डॉ. एन. के अरोरा यांनी सांगितलं आहे.

देशात सध्या असलेल्या कोरोना स्ट्रेनमुळे सध्या धुमाकूळ घातला आहे. या सर्वांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका कमी जाणवत आहे. जोपर्यंत कोरोना स्ट्रेनमध्ये कोणताही मोठा बदल होत नाही, अथवा कोरोनाचा नवीन स्ट्रेन येत नाही, तोपर्यंत कोरोनाची तिसरी येण्याची शक्यता नाही, असंही डॉ. जयप्रकाश मुलियाल यांनी सांगितलं आहे.

कोरोना

दरम्यान, पुणे आणि मुंबई सोबत देशभरात दिल्ली, चेन्नई, बंगळुरू,कोलकाता यांच्यासारख्या शहरात देखील कोरोनाची तिसरी लाट कमी धोकादायक असणार आहे. आधी इंडियन स्ट्रेन म्हणून ओळखला जाणारा आणि आताचा डेल्टा स्ट्रेन सर्वात धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. या स्ट्रेनचे रुग्ण शहरी भागात जास्त सापडल्यानं आता या ठिकाणी कोरोना धोका कमी असल्याचं सांगण्यात आलंय.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here