आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ज्यावेळी आपल्या मुलाला शाळेत टाकण्याची वेळ येते त्यावेळी अनेक पालकांना असे वाटते की नक्की कोणत्या शाळेत टाकावे, अगदी सर्वसामान्य शाळा आणि दुसऱ्या शाळा यांच्याशी ते तुलना करतात. प्रत्येक पालकांची इच्छा असते की आपला मुलगा चांगल्या शाळेत जावा, चांगल्या प्रकारे शिक्षण तो स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि तिथून पुढे चांगली नोकरी शोधून आपल्या जीवनात सेटल व्हावा.

पण मागील का वर्षांपासून असे निदर्शनास आले आहे की पालकांच्या मनात एक गैरसमज झाला आहे की जेवढया प्रसिद्ध आणि जास्त फी घेणाऱ्या शाळा असतील त्या सर्वात शिक्षणाला चांगल्या शाळा आहेत. अशामुले पालक आपल्या मुलाला जरी आपल्याकडे पैशाची कमी असली असली तरी कुठून तरी कर्ज काढून चांगल्या प्रकारे शिक्षण घेण्यासाठी आशा महागड्या शाळेत टाकतात.

तुम्हाला ज्या इंग्रजी प्रसिद्ध शाळा आहेत त्यांच्या फी तर माहीतच असतील, कारण आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तर कोणत्या न कोणत्या पालकांनी त्यांच्या पाल्याला तिथे ऍडमिशन घेतले असते. काही शाळेंच्या फी 1 लाख तर काहींच्या 2 लाख. तसे पाहायला गेले तर दुसऱ्या शाळेपेक्षा या शाळेच्या फी खूपच कमी आहेत, आज आम्ही तुम्हाला आपल्या देशातील अशा शाळा सांगणार आहोत ज्यांच्या फी कमीतकमी 5-10 लाख आहेत. अत्ता तुम्ही आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना घेतले तर वर्षाला आपले उत्पन्न सुद्धा नाही. चला तर पाहू मग कोणत्या कोणत्या शाळा आहेत.

 

महागड्या शाळा
महागड्या शाळा

१. डून स्कूल देहरादून –

भारतामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्यापैकी या शाळेचा क्रमांक खूप वरती लागतो. १९२९ मध्ये या शाळेची तेथील निसर्गरम्य वातावरणात स्थापना झाली. पण ही शाळा फक्त आणि फक्त मुलांसाठी आहे इथे मुलींना प्रवेश दिला जात नाही. अत्ता राहील या शाळेची फी किती असेल.

डून स्कूल या शाळेची वार्षिक फी ९.७ लाख रुपये एवढी आहे, तर प्रत्येक टर्म ला २५ हजार रुपये भरावे लागतात आणि मुलाच्या ऍडमिशन वेळी ३.५० लाख रुपये भरावे लागतात, हे त्याच्या सेक्युरिटी साठी असतात पण हे रिफंडेबल असतात. इथे फक्त आणि फक्त श्रीमंतांची मुले शिकू शकतात कारण सर्वसामान्य लोकांना हे परवडत नाही.

या स्कूल मध्ये राहुल गांधी, राजीव गांधी तसेच हिरो ग्रुप चे सुनील मुंजल आणि पवन मुंजाल यांनी शिक्षण घेतले आहे.

२. मायो कॉलेज अजमेर –

राजस्थान मधील अजमेर येथे हे स्कूल म्हणजे कॉलेज बांधण्यात आले, सुमारे १८७५ साली हे शाळा बांधण्यात आली होती. या शाळेची वार्षिक फी ५.१४ लाख रुपये एवढी आहे.

३. इकोल मोंडीएल वर्ल्ड स्कूल मुंबई –

मुंबई मध्ये जेव्हा महागड्या शाळा आहेत त्यामध्ये या शाळेचा नंबर सुद्धा लागतो, या शाळेमध्ये अनेक प्रोग्रॅम आयोजित केले जातात. या शाळेची वार्षिक फी १०.९ लाख रुपये एवढी आहे.

४. वूडस्टॉक स्कूल मसुरी –

हे एक बोर्डिंग स्कूल आहे , या शाळेमध्ये अभिनेता टॉम अल्टर तसेच प्रसिद्ध लेखिका नयनतारा यांनी शिक्षण घेतले आहे. या शाळेची वार्षिक फी १५.९ लाख रुपये असून ऍडमिशन वेळी ४ लाख रुपये भरावे लागतात. जे नॉनरिफंड असतात.

५. गुड शेफर्ड स्कूल उटी –

या स्कूल च्या आजूबाजूला तुमची जेवढी नजर जाईल तिथपर्यंत झाडेच झाडे आहेत, अगदी निलगरी पर्वतामध्ये वसलेली ही शाळा आहे जो की या शाळेचा परिसर ७० एकर मध्ये पसरला आहे. या शाळेची वार्षिक फी १० लाख रुपये एवढी आहे. इथे मुलाना अगदी चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या जातात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here