आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

अरे देवा, चक्क आता कोरोना माताच सुद्धा मंदिर,कोरोना मातेच्या तोंडाला मास्क लावून होते पूजा


नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आपणास कोरोना मातेच्या मंदिराविषयी माहिती देणार आहोत. ऐकायला सुद्धा विचित्र वाटत ना ? गेल्या वर्ष भरापासून  संपूर्ण दुनियेत कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. असंख्य लोकांनी यात आपले जीव गमावले आहेत. तसेच अनेक लोक बेरोजगार झालेले आहेत.

कोरोना ला घालवण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे उपयोग आणि उपाय करत आहेत. त्यामधून अंधश्रध्दा सुद्धा खूप वाढत चालली आहे या लेखात आम्ही अशीच एक कहाणी सांगणार आहोत.कोरोना

उत्तर प्रदेश राज्यातील एका गावात लोकांनी कोरोना माता देवीचं मंदिर बांधले आहे एवढच न्हवे तर चक्क कोरोना मातेच्या दर्शनासाठी या मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगा सुद्धा लागल्या जात आहेत.

या गावातील सर्व लोकांनी वर्गणी गोळा करून या मंदिराचा निर्माण केला आहे असे म्हटले जातेय.

Advertisement -

प्रतापगड मधील एका छोट्याश्या गावात तेथील गावकऱ्यांनी एका झाडाखाली कोरोना मातेचे मंदिर बांधून त्याची पूजा केली जाते. या मंदिरात कोरोना मातेची मूर्ती प्रस्थापित केली आहे आणि त्या मूर्ती ला मास्क सुद्धा लावलेला आहे. त्याचबरोबर रोजच्या रोज देवीला नैवेद्य सुद्धा दाखवला जातो.

कोरोना

देवीच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांना मास्क घाला, हात वारंवार धुवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं सांगण्यात येते त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी याचे पोस्टर सुद्धा लिहलेले आहेत. त्यामुळं दर्शनासाठी आलेले लोक नियमांचे पालन करून च देवदर्शन घेतात.

या बातमी मुळे हे गाव चांगलेच पप्रसिद्ध झाले आहे सोबतच प्रत्येक ठिकाणी कोरोना माता देवीची चर्चा सुद्धा होऊ लागली. संपूर्ण देशात ही बातमी मोठ्या प्रमाणे वायरल सुद्धा होत असलेले आपल्याला दिसून येत आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here