जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

ads

====

कोरोना संकट टळल्यानंतर देशासमोर ह्या अडचणी असतील..!

सध्या जगभरात्र कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान प्रांतामध्ये कोरोना विषाणूने संक्रमित झालेला पहिला रुग्ण आढळून आला, आणि पाहता पाहता या विषानुने चीनसह,अमेरिका,जापान, इटली, स्पेन, भारत आणि बऱ्याच देशात हातपाय पसरवले.

कोरोना विषाणू चा फटका हा जागतिक व्यापाराला पन बसला असून आत्यावश्यक सेवा वगळता जवळ जवळ सर्वच देशातील व्यवहार बंद आहेत. अश्यातच जिथून या जीवघेण्या विषाणूने हातपाय पसरवले, त्या चिनमध्ये मात्र सध्या कोरोना आटोक्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे, आणि सुरवात केली गेलीय अंतराष्ट्रीय मार्केटवरती कब्जा करण्याची.

चिन कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अनेक देशांना पिपीई किट,मास्क, यांचा पुरवठा करण्यास सरसावला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे पूढे चालून तेलाच्या व्यापाराचा एक महत्वाचा देश बनण्याचं स्वप्न घेऊन चीननी कच्या तेलामध्ये गुंतवणूक करण्यास सुरवात केलीय.

भारतामध्ये पण कोरोनाचा शिरकाव होऊन लगभग दीड वर्ष होत होत आले असून, कोरोना थांवण्यात इतर देशाच्या तुलनेत भारताला बरचस यश आलेलं दिसंत आहे. असं असलं तरी अद्याप देशात कोरोना चे रुग्ण वाढतच असताना दिसताहेत, ही बाब देशासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

 

.कोरोना

चीन ने जागतिक मार्केटमध्ये महत्वाच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे.
त्यामुळे सध्या भारतापूढे देशातील परिस्थिती हाताळत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा आपलं वजन आहे तस ठेवण्याच एक मोठं आव्हान उभे राहील आहे.चीनचे मनसुबे जरी स्पष्ट असले तरी, कोरोनाच्या महामारीत संकटात सापडलेल्या इतर देशाप्रमाणेच भारत सुद्धा नागरिकांना वाचवण्याच्या दृष्टीने महत्वाची पाऊले प्राधान्याने उचलताना दिसून येत आहे.

अश्या परिस्थितीमध्ये भारताने कोरोनावर यशश्वीरित्या मात केली तरी, खरे आव्हान त्यानंतर भारतापूढे येनारे असेल. वाढत्या बेरोजगारी, बरेच दिवस कंपन्या बंद असल्यामुळे इंडस्ट्रीयल मार्केटमध्ये बऱ्याच नोकऱ्या,जाऊन बेरोजगार झालेल्या नागरिकांना सांभाळून त्यांच्या उदरनिर्वाहनाची व्यवस्था करावी लागणार आहे.
एकूणच परिस्थिती पाहता भारताला कोरोना संकट टळल्यानंतर देशांतर्गत प्रश्न तसेच अंतरराष्ट्रीय मार्केटमधील आपले महत्वाचे स्थान साबूत ठेवण्याच एक मोठं आव्हान पेलावं लागणार आहे, तोपर्यंत चीन आपली पकड आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये घट्ट करण्यासाठी सरसावला असेल.

सध्या जरी भारतातील उद्योगधंद्यास चालना देण्यासाठी सरकार कडून हालचाली सुरु झाल्या असल्या तरी कोरोना संकट आजून पूर्णपणे टळलेल नाहीये. याची दखल प्रत्येकाने ठेवायला हवी.येणाऱ्या काळात हे आव्हान आणखी कठीण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे बिघडलेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्याच्या हालचाली सरकारने सुरु केल्या आहेत तर दुसरीकडे नागरिकांचे होणारे हाल पण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याच दिसून येत आहे.एकंदरीत सरकारला भारतातील नागरिक,देशाची अर्थव्यवस्था ह्या सर्वाना सांभाळत आपल अंतरराष्ट्रीय  बाजारपेठेतील स्थान,आणि महत्व सुद्धा साबूत ठेवण्याच मजबूत आव्हान भारतासमोर असेल.

भारत आता येणाऱ्या काळास कश्या प्रकारे सामोरे जातो, हे पाहणे रंजक ठरेलं..

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता.

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here