जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


74 व्या बेस्ट दिनी बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्याचा आणि पुनर्विकसित माहीम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषण केले.

त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो. 74 व्या बेस्ट दिनी बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्याचा आणि पुनर्विकसित माहीम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री म्हणाले, “1874 ते 2021 हा बेस्टचा मोठा प्रवास आहे. पहिली बेस्ट ही घोडगाडीत होती. अजून ट्रामच्या आठवणी आहेत. मला माँ आणि बाळासाहेब ट्राममधून फिरायला घेऊन जात असत. पुढे यात बदल होत गेले. आता ही इलेक्ट्रिकल बस आली आहे. मी शाळेत सुद्धा बेस्ट बसने गेलो होतो. बेस्ट ही सेवा देत आहे”.

Advertisement -

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यावरण  मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here