जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

साकीनाकामध्ये झालेल्या बलात्कारातील महिलेच्या मृत्यूने चित्रा वाघ सुन्न, माध्यमांशी बोलतांना कोसळले रडू..!


साकीनाकामध्ये झालेल्या बलात्काराने सर्वांना सुन्न केलं आहे. या घटनेमध्ये आरोपीने 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. महिलेवर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. अशातच भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ महिलेची भेट घेण्यास रुग्णालयात पोहोचल्या.

9 सप्टेंबरला आरोपीने महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसवली होती. त्यामुळे पीडीत महिलेची प्रकृती प्रचंड नाजूक झाली असून तिच्यावर उपचार सुरु होते. यादरम्यान चित्रा वाघ पीडीत महिलेची भेट घ्यायला रुग्णालयात पोहोचल्या. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली.

चित्रा वाघ

महिलेच्या मृत्यूची बातमी ऐकून चित्रा वाघ ढसाढसा रडल्या. तसेच माध्यमांशी संवाद साधताना देखील त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी मी निशब्द झाले असून महिलांचा अंत पाहू नका, असं म्हटलं आहे. ज्या पद्धतीने महिलेवर आत्याचार झाला तो राक्षसी असून अक्षरशः तिचे आतडे कापले गेल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Advertisement -

दरम्यान, चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यात अनेक आत्याचार होत आहे. जे चालू आहे ते आपण फक्त पाहतोय, करत काहीच नाही, हे कुठं तरी थांबायला हवं, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नसल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकारच उरला नाही, असा घणाघात देखील चित्रा वाघ यांनी यावेळी केला आहे.


हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here