जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

मेगास्टार चिरंजीवीने दिली एका चाहत्याला दिवाळीची खास भेट,कॅन्सरसारख्या घातक आजाराचा संपूर्ण उपचार उचलणार चिरंजीवी..!


बॉलीवूड इंडस्ट्रीमधील स्टार्सना एकीकडे भारतात जास्त महत्व दिल जात नाही परंतु साउथचे स्टार असलेले अभिनेते नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी देवतासारखे असतात . याला कारणही तसच आहे ते स्टार आपल्या चाहत्यांवर सुद्धा जीव ओवाळून टाकतात. असाच काहीस घडलंय साउथ इंडस्ट्रीतील मेगास्टार चिरंजीवी यांच्यासोबत..

चिरंजीवी

मेगास्टार म्हणून प्रसिद्ध असलेला दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी त्याच्या एका चाहत्याला अशी भेट देणार आहे, जी तो कधीच विसरू शकत नाही. खरं तर चिरंजीवीने कर्करोगाशी लढा देत असलेल्या त्याच्या एका चाहत्याला त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याचे वचन दिले आहे. चाहत्याचा वैद्यकीय अहवाल पाहून चिरंजीवीने त्याला पुन्हा खासगी रुग्णालयातून उपचार घेण्यास सांगितले असल्याचे बोलले जात आहे.

चिरंजीवीने नुकतेच त्याचा चाहता वेंकट याची त्याच्या कार्यालयात भेट घेतली. वेंकट कॅन्सरसारख्या घातक आजाराने ग्रस्त असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत आहे. त्याच्याकडे उपचार करण्यासाठी पुरेसे पैसेही नाहीत. चिरंजीवीला ही बाब कळताच त्यांनी व्यंकटच्या उपचाराचा संपूर्ण खर्च देण्यास सांगितले.

Advertisement -

चाहत्याचा वैद्यकीय अहवाल पाहिल्यानंतर चिरंजीवीने त्याला हैदराबादमधील खासगी रुग्णालयात जाऊन बोलण्यास सांगितले. यासोबतच चिरंजीवीने त्यांच्या टीमला या प्रकरणी काय अपडेट आहे ते कळवण्यास सांगितले आहे. व्यंकटच्या उपचारासाठी चिरंजीवीने तात्काळ 2 लाख रुपये दिले आहेत. चिरंजीवीची मदत मिळाल्यानंतर व्यंकटच्या आनंदाला पारावार उरला नाही. आयुष्यभर त्यांचे आभार मानले तरी कमी पडेल असे व्यंकट म्हणाले. चिरंजीवी लवकरच त्याच्या आगामी ‘आचार्य’ चित्रपटात दिसणार आहे. त्यांच्याशिवाय रामचरण तेजा, काजल अग्रवाल, पूजा हेगडे ही सुद्धा यात काम करत आहेत.

चिरंजीवी यांनी 1980 मध्ये सुरेखासोबत लग्न केले. त्यांना तीन मुले आहेत. राम चरण तेजा असे मुलाचे नाव असून तो दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता आहे. रामचरण व्यतिरिक्त चिरंजीवीला श्रीजा आणि सुष्मिता या दोन मुली आहेत. सुष्मिताचा विवाह 2006 मध्ये विष्णू प्रसादसोबत झाला होता. त्याचवेळी श्रीजाने 2007 मध्ये शिरीष भारद्वाजसोबत गुपचूप लग्न केले होते. मात्र नंतर दोघांचे नाते बिघडू लागले. श्रीजाने शिरीषवर हुंडा मागितल्याचा आरोप केला होता. पुढे दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2016 मध्ये घरच्यांच्या इच्छेनुसार श्रीजाने ज्वेलरी व्यावसायिक कल्याणसोबत लग्न केले.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here