जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

तेजस ठाकरे माझ्या डोक्याबाहेरचा विषय, राजकारणात येईल असं वाटत नाही :छगन भुजबळ


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याचं सुतोवाच महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही त्यावर भाष्य केलं आहे. तेजस ठाकरे माझ्या डोक्याबाहेरचा विषय आहे. जीवसृष्टी सोडून तो राजकारणात येईल, असं वाटत नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. तेजस अतिशय अवघड आहे. माझ्या डोक्याबाहेरचा विषय आहे तो. जीवसृष्टी सोडून तो राजकारणात येईल असं वाटत नाही. अर्थात त्याबाबतचा निर्णय ठाकरे कुटुंबीयच घेतील, असं भुजबळ म्हणाले. तसेच युवकांनी राजकारणात आलं पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

भाजप-मनसे एकत्र येत असेल तर चांगलं आहे

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवरही भाष्य केलं. भाजप-मनसे एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे. लोकशाहीत सर्वांना एकत्र येण्याचे अधिकार आहेत. शेवटी कुणाच्या बाजून कौल द्यायचा हे लोकं ठरवत असतात, असं ते म्हणाले.

व्हेरिएंटचा धोका नाही, पण…

डेटा सँम्पलचे आकडे जून आणि जुलैचे आहेत. सँम्पलचे रिपोर्ट यायला दोन महिने लागतात. यातील काही रुग्ण महिनाभरापूर्वीच बरे झाले आहेत. तसेच रुग्णांची माहिती वेळोवेळी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होतो. हा व्हेरिएंट चार दिवसात वेगाने पसरतो. धोका नाही. मात्र, प्रसार वेगाने होतो, असं ते म्हणाले.

Advertisement -

ठाकरे

नाशिकमध्ये कोरोनाचे 1073 रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसात आकडा खाली येत नाही. जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट 1.9 टक्के आहे. तर 139 रुग्ण ऑक्सिजनवर आहे. मृत्यू दर 2.12 टक्के आहे. राज्याच्या दृष्टीने परिस्थिती ठिक आहे. म्युक्रमायकोसिसमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. म्युक्रमायकोसिसमधून बरे झाले असे 25 टक्केच रुग्ण आहेत, असंही त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात आतापर्यंत 1473000 लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 56358 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण 27.16 टक्के लोकांना एक किंवा दोन डोस दिले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

हवेतून ऑक्सिजन निर्माण करणार

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणावी लागेल. बाजूच्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. जवळपास प्रत्येकाचं थर्मल चेकिंग करण्यात येणार आहे, असं ते म्हणाले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या यंत्रसामुग्री 23 ठिकाणी आली आहे. या शहरात 13 ठिकाणी ही सामुग्री आली आहे. सध्या इथे 400 मॅट्रीक टन ऑक्सिजनची गरज आहे. मनपानेही लिक्विड ऑक्सिजनची व्यवस्था सुरू केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here