जगभरातील रंजक माहिती आणि ताज्या बातम्यांकरिता आमच्या  फेसबुक पेजला लाईक करा.

====

मित्राच घर व्यवस्थित चालावे यासाठी स्वतः ब्रिटिशांना आत्मसमर्पण करण्यास तयार झाले होते आझाद.!.


23 जुलै म्हणजे आजच्याच दिवशी 1906 मध्ये सीताराम तिवारी आणि जागरानी देवी यांच्या घरी मुलाचा जन्म झाला. चंद्रशेखर असे त्याचे नाव ठेवले. मध्य प्रदेशातील भाबरा येथे जन्मलेल्या चंद्रशेखरचे आझाद कसे नाव ठेवले गेले यामागेही एक कथा आहे. आझादच्या आईला त्यांना संस्कृत अभ्यासक बनवायचे होते पण मोठे होता होता त्यांना उमगले कि देशाला इंग्रजांपासून मुक्त करण्याची आझादची योजना आहे. आम्ही आझादच्या आयुष्यातील काही रोचक कथा आज या लेखाच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहोत.

चंद्रशेखर तिवारी ते चंद्रशेखर आझाद

जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सर्व मोठे क्रांतिकारक प्रोटेस्टवर उतरले. चंद्रशेखर अशाच  निषेध आंदोलनाचा एक भाग झाले होते. ज्यामध्ये इंग्रजांनी त्यांना अटक केली. त्यावेळी ते फक्त 16 वर्षांचा होता. जेव्हा त्यांना अटक करण्यात आली तेव्हा न्यायालयात हजर केले गेले. जेव्हा न्यायाधीशाने त्यांना नाव, पत्ता आणि वडिलांचे नाव विचारले असता चंद्रशेखर यांनी उत्तर दिले की, “माझे नाव आझाद आहे, वडिलांचे नाव स्वतंत्र आहे आणि पत्ता जेल आहे.

चंद्रशेखर यांचे हे उत्तर ऐकून न्यायदंडाधिकारी चकित झाले होते.

Advertisement -

काकोरी घटनेनंतर इंग्रज पोलिस त्यांच्या मागे हात धुवून लागले होते. सॉन्डर्स हत्या, काकोरीची घटना आणि असेंब्ली बॉम्बस्फोटानंतर आझाद झांसी येथे आले..ते त्यावेळी 10 वर्षे फरारच होते. ज्यामध्ये बहुतांश वेळ फक्त झांसी व आसपासच्या जिल्ह्यात घालवला होता.

चंद्रशेखर आझाद

त्यादरम्यानच मास्टर रुद्रनारायण सक्सेना यांच्याशी भेट झाली. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला व दोघांमधील मैत्रीची बी पेरण्याचे हे पुरेसे कारण होते. चंद्रशेखर आझाद बरेच वर्षे त्यांच्या घरी राहिले. ब्रिटीशांपासून पळ काढण्यासाठी ते बहुतेक वेळेस एका खोलीच्या खाली बांधलेल्या छुप्या ठिकाणी म्हणजेच तळघरात लपून राहिले व आपल्या चळवळीच्या कामासाठी ते तिथेच आपल्या मित्रांसह योजना बनवत होते.

रुद्रनारायण एक क्रांतिकारक तसेच एक चांगले चित्रकार होते. त्यांनी एका हातात बंदूक आणि दुसर्‍या हातात मिशी ठेवून चंद्रशेखर आझाद यांचे चित्र बनवले होते जे खूप जास्त प्रसिद्ध झाले. हे करण्यासाठी रुद्र नारायण यांनी आझादला बराच काळ उभे ठेवले होते. असे म्हणतात की या चित्रावरून इंग्रजांनी आझादला ओळखले नाही.

जेव्हा इंग्रजांना या चित्राबद्दल कळले तेव्हा त्यांनी आझादला सुपूर्द करण्याराला रक्कम बक्षीस देण्यात येईल असे जाहीर केले. याशिवाय आणखी एक फोटोही आहे, ज्यामध्ये ते रुद्रनारायण यांच्या पत्नी आणि मुलांसमवेत बसले आहेत. हा असा काळ होता जेव्हा रुद्रनारायण यांच्या घराची अवस्था चांगली नव्हती हे आझादकडून पाहिल्या जात नव्हते.

त्यांनी इंग्रजांना शरण जाण्याचे मान्य केले जेणेकरूनत्यांच्या मित्राचे घर त्याला मिळालेल्या बक्षीस रकमेमुळे चांगले चालू शकेल. चंद्रशेखर आझाद यांची शैली आणि धैर्य अजूनही मास्टर रुद्रनारायण यांच्या घरात आहे. तो बेड अजूनही आहे, ज्यावर आझाद बसत असतं.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here