क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

विराट कोहली नंतर हे ३ क्रिकेटपटू होऊ शकतात भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार


भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून ओळख असलेल्या विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. त्याच्या या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कर्णधारपदाच्या जबाबदाऱ्यांमधून सुटका करत त्याने आता आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करणे पसंत केले आहे. गेली दोन वर्षे त्याने फलंदाजीमध्ये फारशी चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळालेली नाही.

आगामी टेस्ट मॅचेस साठी भारतीय क्रिकेट संघाला एका चांगल्या कर्णधाराची गरज आहे. अजून नवीन कर्णधाराची निवड झाली नसली तरी त्याबद्दल क्रीडा रसिकांमध्ये फार उत्सुकता लागून राहिली आहे. भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेटपटू आहेत, जे या पदासाठी लायक ठरू शकतील.

Team India Captain

ऋषभ पंत
२३ वर्षीय ऋषभ पंत गेल्या काही महिन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मध्ये झालेल्या सामन्यांमध्ये त्याच्या फलंदाजी आणि विकेट किपिंगने त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची विकेट किपिंग माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसारखी स्मार्ट आहे. त्याच्या अनुभवाच्या जोरावर त्याचे कर्णधारपद निश्चित होऊ शकते.

Advertisement -

 

श्रेयस अय्यर
२६ वर्षीय श्रेयस अय्यर ची टेस्ट मॅच च्या कर्णधारपदी वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे. लवकरच तो टेस्ट मॅच मध्ये पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे. वनडे आणि टी-२० मध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे.

 

केएल राहुल
२९ वर्षीय या खेळाडूची देखील कर्णधारपदी नियुक्ती होऊ शकते. टेस्ट मॅच मधील राहुलचा अनुभव जास्त आहे. तसेच त्याला भारतीय आणि विदेशी खेळपट्टी संदर्भात बरीच माहिती आहे.

 


हेही वाचा:

MI vs CSK live: थाला पुन्हा फेल! जीम्मेदारीच्या वेळी धोनीने टाकली स्वतःची विकेट,चाहते नाराज..

या भारतीय क्रिकेटपटूकडे आहेत स्वतःचे प्रायवेट जेट, किंमत जाणून फिरतील डोळे..!

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here