आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आजकाल प्रत्येक महिलेने आपल्या पायांवर खंबीर उभे राहिले पाहिजे. स्वतःचे विश्व तयार केले पाहिजे. या साठी महिलांनी व्यवसाय केला पाहिजे. महिला घर सांभाळून सुद्धा व्यवसाय करू शकतात. तसेच आम्ही या लेखात आज असे व्यवसाय सांगणार आहोत की जे घरबसल्या आणि कमी भांडवलात करता येतील.

उद्योग
उद्योग

1) मेहंदी  आर्टिस्ट :- जर का तुम्हाला चांगल्या प्रकारे मेहंदी काढता येत असेल तर तुम्ही यातून सुद्धा भरपूर पैसे कमवू शकता. आजकाल बाजारात मेहंदी डिझायनर ला खूप मागणी आहे. लग्नाच्या ऑर्डर घेऊन सुद्धा पैसे कमवू शकता.

2) इव्हेंट मॅनेजमेंट:- इव्हेंट मॅनेजमेंट करून सुद्धा कमी भांडवलात आपण पैसे कमवू शकतो. हा व्यवसाय कमी भांडवला मध्ये सुद्धा करता येतो. वाढदिवस, लग्न, साखरपुडा तसेच बारसे या सारख्या कार्यक्रमाचे नियोजन आणि डेकोरेशन साठी घ्यावे.

3) फूड, रेसिपी क्लास:- बहुतांशी महिलांनी फूड आणि रेसिपी चे क्लास घ्यावे आणि इतर महिलांना वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकावे आणि त्या क्लासेस मधून पैसे कमवावे. हे तुम्ही घरबसल्या सुद्धा करू शकता.

Advertisement -

4)ऑन डिमांड फूड डिलीव्हरी:- ऑन डिमांड फूड डिलिव्हरी नुसार जेवण बनवणे आणि पोहचवणे हे सुद्धा तुम्ही करू शकता आणि पैसे कमवू शकता. घरची कामे उरकून नंतर तुम्ही हे करून सुद्धा पैसे कमवू शकता.

5)हॅन्ड क्राफ्ट:- वेगवेगळ्या प्रकारच्या हॅन्ड क्राफ्ट तसेच शिवणकाम आणि विणून सुद्धा त्याची विक्री करता येते तसेच कपडे शिवणे म्हणजेच शिवणकाम करून सुद्धा बक्कळ पैसे कमवता येऊ शकतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here