जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

मुलाच्या जमानातीनंतर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया, वकिलांनी सांगितली सर्व घटना….!


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या जवळच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. अखेर त्यांचा मुलगा आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. आर्यन शुक्रवारी किंवा शनिवारी त्याच्या घरी परतणार आहे. त्यामुळे त्यांच्या मन्नत या बंगल्यावर दिवाळीचा माहोल आहे. पण तुम्हाला माहित आहे का की गुरुवारी जामीन आदेश आल्यानंतर शाहरुख हसला नाही तर त्याच्या डोळ्यात अश्रू होते.

वकिलांनी सांगितला घडलेला सर्व प्रकार..

मुंबई रेप पार्टी प्रकरणात अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्याशिवाय जामीन अर्जही मंजूर झाला आहे. तिघांचीही लवकरच तुरुंगातून सुटका होऊ शकते. या जामिनाच्या वृत्तानंतर शाहरुख खानचे फोटोही समोर आले आहेत ज्यात तो त्याच्या कायदेशीर टीमसोबत हसताना दिसत आहे. मात्र मीडियाशी बोलताना त्याचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, शाहरुख खानला जामीन मंजूर झाल्याचे समजताच त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

शाहरुख खान

Advertisement -

 

शाहरुखच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते

याबाबत बोलताना माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले, ‘शाहरुख जेव्हा मला पहिल्यांदा भेटायला आला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. पण आता सुटकेचा नि:श्वास सोडल्याने त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. रोहतगी पुढे म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. त्यांनी स्वत: या प्रकरणासाठी स्वतःच्या नोट्स तयार केल्या आणि माझ्याशी चर्चा केली.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने 2 ऑक्टोबरच्या रात्री एका रेव्ह पार्टीवर छापा टाकून आर्यनला अटक केली होती. पण एनसीबीला आर्यन खानकडून कोणतेही ड्रग्ज किंवा बंदी असलेले ड्रग्ज मिळालेले नाही. त्यानंतरही आर्यन ३ ऑक्टोबरपासून कोठडीत होता. त्यानंतर विशेष एनडीपीएस कोर्ट आणि मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. याप्रकरणी आर्यनचा जामीन गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here