जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

या बॉलीवूड अभिनेत्रींच्या लग्नामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला, आकडे वाचून बसेल आश्चर्याचा धक्का..!


विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. या लग्नाची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. कोरोनामुळे जिथे लग्नसमारंभात पाहुण्यांची संख्या मर्यादित झाली आहे. कोरोनापूर्वी सोनम कपूर-आनंद आहुजा, दीपिका पदुकोण-रणवीर सिंगपासून प्रियांका चोप्रा आणि निक जोनासपर्यंत अनेक बिग फॅट वेडिंग्स चर्चेत होत्या.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा विवाह 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीतील व्हिला डेल बाल्बियानेलो येथे झाला. लग्नानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने बेंगळुरू आणि मुंबईत लग्नाचे रिसेप्शन दिले. या लग्नाची खूप चर्चा झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका आणि रणवीरच्या लग्नात एकूण 77 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

अभिनेत्री

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न २०१७ मध्ये इटलीत झाले होते. लग्नानंतर विराट आणि अनुष्काने दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शन दिले. दिल्लीतील रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. या लग्नात विरुष्काने खूप खर्च केला होता. खुद्द अनुष्काची एंगेजमेंट रिंग 1 कोटीच्या आसपास होती. यावरून अंदाज बांधता येतो की लग्न किती मोठे झाले.

Advertisement -

प्रियांका चोप्रा – निक जोनास: प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 1 डिसेंबर 2018 रोजी उम्मेद भवन, राजस्थान येथे शाही पद्धतीने लग्न केले. प्रियांका आणि निक जोनासने लग्नासाठी लाखो रुपये खर्च केले. प्रियंका आणि निकचे लग्न आधी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार आणि नंतर हिंदू रितीरिवाजांनुसार झाले. लग्नानंतर दोघांनी दिल्ली आणि नंतर मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शनही दिले.

सोनम कपूर आणि आनंद आहुजा: सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचे लग्न २०१८ मध्ये झाले. हा विवाह आनंद कारज रितीरिवाजानुसार पार पडला. लग्नानंतर दोघांनी मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शनही दिलं.

करीना कपूर आणि सैफ अली खान: करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी २०१२ साली लग्नगाठ बांधली. हा त्या वर्षातील सर्वात मोठा विवाहसोहळा होता. तिच्या लग्नात करीना कपूरने सोन्याने जडवलेली साडी नेसली होती.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here