आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

बिल गेट्स यांचे नाव ऐकले आपल्या डोळ्यासमोर एक श्रीमंत व्यक्तीचा चेहरा उभा राहतो जे एक सर्वसामान्य व्यक्तीसारखे जीवन जगतात, त्याचे विचार एवढे ग्रेट आहेत की नवीन पिढीने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे संस्थापक असून जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाते. तुम्हाला सांगयचे झाले तर त्यांना शेतीमध्ये खूप रस आहे, अमेरिकेत सर्वात जास्त शेती बिल गेट्स यांच्याकडे आहे. सुमारे २ लाख ६९ हजार एकर त्यांची शेती आहे, जी कमीत कमी १८ राज्यामध्ये पसरलेली आहे.

बिल गेट्स
बिल गेट्स

विविध राज्यांमध्ये शेती –

एका अहवालानुसार असे समजण्यात आले की बिल गेट्स यांची उत्तर लुसियाना राज्यात ७० हजार एक जमीन आहे त्यामध्ये ते सोयाबीन, मका, कपाशी आणि भात इ. पीक घेतात. तर नेब्रास्का मध्ये २० हजार एकर जमीन आहे, येथे ते सोयाबीन चे पीक घेतात. तसेच जॉर्जिया मध्ये ६ हजार एकर तर वॉशिंग्टन मध्ये १४ हजार एकर जमीन आहे तिथे ते जास्तीत जास्त बटाट्याचे पीक घेतात.

Advertisement -

गेट्स यांनी एवढी शेती का घेतली असावी –

बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी एवढी शेती का घेतली आहे हे अजून स्पष्ट झाले नाही पण अहवालानुसार असे अंजते की हवामान बदलामुळे त्यांनी एवढी शेती घेतली आहे. बिल गेट्स आणि मेलिंडा ने एक विनानफा असा गट तयार केला आहे त्यामध्ये भारतातील जे छोटे शेतकरी आहेत याना शेतात येणाऱ्या संकटांना कसे सामोरे जावे असे शिक्षण देण्यात येत आहे.
बिल गेट्स आणि मेलिंडा यांचा २७ वर्षाचा प्रवास अत्ता थांबला असून खूप लोकांच्या मनात ही खळबळ चालू आहे की अत्ता नक्की हा कार्यकारभार कोण सांभाळणार तर यावर स्पष्ट आहे की गेट्स फाउंडेशन दोघेही सांभाळत आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here