जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

या मराठमोळ्या अभिनेत्रीला व्हायचंय तीन-चार मुलांची आई, जास्तच आहे रोमान्सचा छंद..


बॉलिवूडमधील अभिनेत्री भूमी पेडणेकरने आपल्याला 3-4 मुलं हवी असल्याचं म्हटलं आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना तिने मुलांबाबत माहिती दिली. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती बोलत होती. या मुलाखतीवेळी तिने लग्नाबद्दल आणि कोरोनानंतर सेेटवर कशा प्रकार वातावरण असतं याबाबत तिने दिलखुलासपणे गप्पा मारल्या.

लग्नाबाबत मी काही ठरवलं आणि काही विचार केले आहेत. त्या विचारांशी मी कधीही तडजोड करणार नाही. जर मला माझ्या आवडीचा जोडीदार मिळाला तरच मी लग्न करणार असल्याचं भूमी म्हणाली. त्यासोबतच मी खूप रोमॅन्टिक असून मला मी लग्नावर विश्वास ठेवते आणि मला वाटतं माझी 3 ते 4 मुलं असावीत, असंही भूमी पेडणेकरने सांगितलं.

अभिनेत्री

जेव्हा मी शुटींगमधून वेळ काढते तेव्हा मला कुटुंबासोबत वेळ घालवायला खूप आवडतं. मी घरात माझ्या आईला बॉस मानते, असं भूमीने सांगितलं. भूमीला त्याच्या क्रशबद्दल विचारलं तेव्हा तिन ऋतिक रोशन, शाहरूख खान, शाहीद कपूर आणि आमीर खानसोबत काम करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.

Advertisement -

दरम्यान, कोरोनानंतर सेटवरच्या वातावरणाबद्दल बोलताना भूमी म्हणाली, पूर्वीसारखं लोकं एकत्र जेवत नाहीत. तोंडाला मास्क लावून काम करत असल्याचं भूमी म्हणाली. त्यासोबतच कोरोना झाल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर पहिल्यासारखा ग्लो राहिला नाही आणि केस गळायला लागल्याचं भूमीने सांगितलं.

=

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

या वयातील महिलांना असते रोमान्सची सर्वांत तीव्र इच्छा.. झाला खुलासा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here