जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====


पपई च्या पानांच्या रसामध्ये असणाऱ्या अत्यंत गुणकारी औषधी गुणधर्मांबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी.!


 

पपईच्या झाडाचा प्रत्येक भाग हा कमी येतो यामुळे या झाडाला खूप महत्व प्राप्त झालेले आहे. केवळ पपईच नाही तर पूर्ण झाडातच औषधी गुणधर्म दडलेले आहेत. आज आपण याचबद्दल अधिक माहिती घेऊया.

 

पपईच्या हिरव्या पानांमध्ये विटामिन ए, बी, सी,आणि ई हे भरपूर प्रमाणात असतात. तसेच यामध्ये कैल्शियम, मैग्नीशियम, आयरन, सोडियम यांचीही मात्रा भरपूर असते. पपईच्या पानांचा उपयोग अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. पपईच्या पानांचा रस हा अत्यंत गुणकारी असतो. आज जाणून घेऊया पपईच्या पानांच्या रसाचे आरोग्यदायी फायदे.

 

डेंगूवर उपचार करण्यासाठी.

डेंगूची लागण झाल्याने रक्तात प्लेटलेट काउंट ची कमी होते. पपईच्या पानांचा रस प्लेटलेट वाढवण्यासाठी मदत करते. हा रस २५ मिली दिवसातून दोन वेळा पाण्यासोबत घेतल्याने डेंगूवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.

पपई

यकृत निरोगी ठेवण्यासाठी.

पपईच्या पानांच्या रसाने यकृताची कार्यप्रणाली सुधारण्यास मदत होते. या रसामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे यकृतासाठी नुकसानदायक असलेले सर्व घटक नष्ठ होतात. कावीळ, लिवर किरहोसिस यावरही खूप प्रभावी आहे.

 

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी.

त्वचेवर पपईचा रस लावल्याने त्वचा कोरडी पडण्याची समस्या दूर होते. हा रस एक नैसर्गिक मॉइस्चराइज़र आहे. चेहऱ्यावर येणारे पिंपल आणि खीळ यांना कमी करतो. तेलकट त्वचेवरही पपईचा रस रामबाण उपाय आहे.
केसांची वाढ होण्यासाठी आणि डेनड्रफ करण्यासाठी सुद्धा हा खूप फायदेमंद आहे.

 

मलेरिया आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी.

पपईच्या पानाच्या रसामध्ये एसिटोगोनिन कंपाउंड असते ज्यामुळे मलेरियावर उपचार करण्यासाठी मदत होते. याचे प्लास्मोडायस्टेटिक गुण हे अप्रत्यक्षपणे मलेरियाची ताप कमी करण्यास मदत करतात. यामध्ये असणारे औषधी गुणधर्म इंसुलिनची सेंसिटिविटी वाढवण्यास आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी होऊन किडनीला नुकसान पोहचण्यापासून वाचवते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

भिजलेल्या मनुका खाण्याचे आरोग्यदायी फायदे.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here