आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जाणून घ्या काळ्या चहाचे आरोग्याला होणारे फायदे!


प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात चहाने होते, प्रत्येकाला चहा खूप आवडतं असतो. अनेकांना जर सकाळी चहा नाही भेटला तर त्यांना दिवस खराब गेल्यासारखे वाटते त्यामुळे ते लोक नेहमी चहा पितात. पण तुम्हाला सांगायच झाले तर अधिक प्रमाणात चहा घेणे सुद्धा खुप धोकादायक आहे त्यामुळे आपल्याला पित्त होते कधी ऍसिडिटी होऊ शकते.

चहाचे दोन प्रकार असतात त्यामध्ये एक म्हणजे काळा चहा त्याला आपण कोरा चहा असे म्हणतो आणि दुसरा चहा म्हणजे दुधाचा चहा. जास्तीत जास्त लोक दुधाचा चहा घेतात. दुधाचा चहा जरी चवीला चांगला असला तरी त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर वाईट पडतात. म्हणून आपण दुधाचा चहा पिणे टाळले पाहिजे. चहा

दुधाचा चहा पिल्याने आपली जी पचनशक्ती असते त्यावर अविपरित परिणाम घडतो, जसे की आपल्याला भूक लागत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीराचे पालन पोषण चांगल्या प्रकारे होत नाही. आपण दुधाचा चहा थांबवून रोज काळा चहा प्यायला सुरू केले पाहिजे, आपल्या शरीरासाठी हा चहा चांगला सुद्धा असतो.

काळा चहा पिल्याने आपल्या शरीरात ज्या कॅन्सर होण्याच्या पेशी असतात त्या डॅमेज होयला सुरू होते आणि आपल्या कॅन्सर पासून बचाव होतो, आयुर्वेदा नुसार काळा चहा पिणे आपल्या शरीराला चांगले आहे त्यामुळे आपली समरणशक्ती सुद्धा वाढते.

चहा

काही लोक अशी आहेत की ते विसरभोळे असतात त्यांच्यासाठी काळा चहा पिणे चांगले आहे. काळ्या चहाने दिवसभर ऊर्जा टिकून राहते तसेच कमी वयात काही लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या तसेच पिंपल्स येतात त्यासाठी सुद्धा काळा चहा घेणे आवश्यक आहे. काळा चा घेतल्याने आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तसेच काळे डाग नाहीसे होतात.

तुम्ही जर काळा चहा लवंग टाकून घेतला तर तुमची रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा सुधारते आणि काही आजार नष्ट होतात आणि कोणतेही आजार उदभवत नाहीत. त्याचबरोबर तुमचे आरोग्य सुद्धा चांगले राहते, म्हणून आपण काळा चहा घेतला पाहिजे. आपल्या शरीरात जे कोलेस्ट्रॉल असते ते कमी होण्यास मदत होते आणि आपले वजनही वाढत नाही. अशा प्रकारे काळ्या चहाचे फायदे आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here